Thursday, May 31, 2018

कृष्ण सावळा

काळा काळा
कृष्ण सावळा
मागे गोपिकांचा मेळा
मानमोहना तू रे
लाविला साऱ्यासी लळा
एक राधा ती
प्रेम फुलले अंतरात
तिज भासे तू निळा
फुलला बहरला मळा
सूर बासरीचे तुझ्या
तृप्तीचा आनंद वेगळा
Sanjay R.

Friday, May 18, 2018

मी वर्हाडी

" मी वर्हाडी "

वाट्ते ना भाऊ मलेबी
वऱ्हाडीचा अभिमान।

वऱ्हाडात जलमलोना
मुनच हाये मले साभिमान ।

लयच झालना का भौ
घेतो मी बी देवाची आन ।

साधाच मानुस मी
नको मले बापू मान पान ।

नसन ना हुशार मी
तरी हाये मले सारंच ग्यान ।

तुया इतलाच आसन मी
नको समजू मले ल्हान ।

जास्त नाई पर सांगतो तुले
लय फिरलो मी रान न रान ।

आरशात बी पाऊनच हावो
ठीक ठाकच हाये महा वान ।

कंदी मंदी पूजा बी करतो
देतो गरीबायले थोडं दान ।

बोललं कोनी का मंग ना
सुटते आपलंबी मंग भान ।

वरहाडाची मातीच अशी
काळी मुलायम लोण्यावानी छान ।
Sanjay R.

ओढ

नाकात नथनी
कपाळी टिकली

डोळ्यात तुझ्या
ओढ दिसली

थोडी तू हसली
अंतरात बसली

ये ना सखे तू
हृदयात ठसली
Sanjay R.

Wednesday, May 16, 2018

हवा फक्त पेन

झाड वेल
हत्ती घोडा
कावळा चिमणी
नदी नाले
सारेच
निसर्गाची देणं
लिहायला हवा
फक्त पेन

Monday, May 14, 2018

अंतरातला आवाज

आई हा अंतरातला आवाज
मम्मीला थोडा इंग्रजीचा साज ।

मम्मी असो वा आई कुणाची
नाते असे की शिरावरती ताज ।

तळ हातावर जपले तुज तिने
का इतकारे चढला तुज माज ।

नाकोरे धाडू वृद्धाश्रमी तिला
विकून खाल्ली कारे तू लाज ।

तुही जप ठेव तिच्या प्रेमाची जाणीव
आनंदी होईल दिवस तुझा आज ।
Sanjay R.