Monday, March 12, 2018

" उन्हाच्या झळा "

निळ्या निळ्या आकाशात
सुर्याचा एक टिळा ।
गर्मीनं त्याच्या निघतो
भाजुन सारा हुळा ।
चिंब जातो भिजुन देह
होतो निळा काळा ।
आटते पाणी रक्ताचे
तहानेनं व्याकुळ गळा ।
सावलीची माया कशी
लागते धाप सोसताना कळा ।
Sanjay R.

Saturday, March 10, 2018

" उन सावली "

उन्हाळ्यातला एक दिवस
पावसाची झलक दाखवुन गेला ।
आता तर नुसता
महिना मार्चच सुरु झाला ।

हळु हळु सुर्य बघा
लागला किती तापायला ।
आज कसा हा दिवस
उन सावलीचा खेळ सुरु झाला ।

ढगांनी आकाशात
गलबला केला ।
बघुन सुर्य ही सारं
ढगा आड झाला ।

पावसाच्या थेंबांना
उत्साह थोडा आला ।
आ वासलेली धरा
जिव तिचा विसावला ।

कण नी कण धुळीचा
मनसोक्त न्हाला ।
उरली सुरली पानं झाडांची
सरसावली पाणी प्यायला ।

पशु पक्षी झाडे झुडपे
लागले सारे डोलायला ।
उष्ण होउन वाहणारा
वाराही कसा शांत झाला ।
Sanjay R.

महिला दिन

चला घेउ या आन
द्यायचा महिलांना सम्मान
पुसुन टाकायचे सारे
पुराणातले अज्ञान
स्त्रीचा मान
पुरुषाची शान
प्रगती पथावर जायचे
सोबतीला असेल विज्ञान
चला घेउ या आन
S. Ronghe

Thursday, March 1, 2018

" रंगाचा मेळ "

जिवन रंगांचाच खेळ
सुख दुखा:चा त्यात मेळ
हसत हसत जगा नाहीतर
हळुच संपेल ही वेळ
© Sanjay R.

" पेटवु एकदाच होळी "

पेटवायची आज होळी
चला निघु या घेऊन झोळी ।

मरे तोवर राबतो कसा
काळ्या मातीत रे बळी ।

घामा रक्ताने तुझ्यारे
झाली ओली माती काळी ।

काळजीनं लेका तुझ्या
पडली गालावर खळी ।

नाही तमा कुणा सरकारी
पडल्या पोटाच्या वळी ।

उपाशी पोट रे तुझे
व्यापारी भाजतो त्यावर पोळी ।

लेकरं तुझी रे राजा
कोरडीच वाजवतात टाळी ।

येयील कधी किव तुझी
फोड रे तु आता किंकाळी ।

नको झेलुस घाव आता
टाक पेटवून एकदाच होळी ।

लाकडंही नको ठेवु बाकी
कळेल सार्यासी मग दिवाळी ।
© Sanjay R.