Wednesday, February 28, 2018

" नारी तुझा मान "

अगं नारी काय तुझा मान
करु किती कसा तुझा मी सन्मान ।

जगताची तु आहेस माता
ममत्व आहे तुझीच शान ।

ज्ञानाचा तु आहे सागर
गाउ किती सांग तुझे मी गुणगान ।

कधी माता तर कधी होतेस सखी
संगीनी ,अर्धांगिनी भुमिका तुझ्या महान ।

तलवार हाती घेउनी लढतेस
शुर विरांच्या गाथेतले
आहेस अद्वैत पान ।

कधी अंबा कधी जगदंबा
दैत्यांचे तुची मिटवी निशान ।

काळानुसार बदलसी रुप
तिनही लोकी आहे तुच महान ।

संसार रथाचे चाकही तुच
सुखी संसारासी तुझेच वरदान ।

परी सोसते तिर निष्ठुरांचे
सारेच आहेत अजुनही अजान  ।

पुजनिय तु, मी वंदन करतो
तुजविण आम्हा काय कसला अभिमान ।

आसवांत मी तुझ्या शोधतो
कुठे हरवला माझाच मी प्राण ।
© Sanjay R.

Saturday, February 24, 2018

" दरवळ "

कुणास ठाउक आज
मोगरा फुलला नाही ।

सुगंधही कुणास ठाउक
आज दरवळला नाही ।

प्रियकरानं प्रेयसीला
गुलाबही दिला नाही ।

गोड गुलाबी चेहरा तिचा
आज हसला नाही ।

थेंब डोळ्यातला आसवाचा
का कुणास कळला नाही ।
© Sanjay R.

Friday, February 23, 2018

" निरभ्र आकाश "

परसातला माझ्या मोगरा
का नाही आज बहरला ।
सरला असेल का गंध
की फुलायचेच तो विसरला ।
जपलेल्या त्या आठवणी
का अशाच त्या विखुरल्या ।
गुणगुणतात शब्द अजुनही
कानाशीच ओळी अडखळल्या ।
कवितांना नाहीत बंध
लेखणीतून त्या सळसळल्या ।
झाले निरभ्र आकाश सारे
भावना मनातच हळहळल्या ।
© Sanjay R.

" लुट चोरांची "

घाम गाळावा शेतकर्यानं ।
खिसा कापावा व्यापार्यानं ।

संधी द्यावी सरकारनं ।
ओरड करावी विरोधकानं ।

बँक लुटावी श्रिमंतानं ।
भोग भोगा्वे गरिबानं ।

मिली भगत चाले जोरानं ।
देश लुटला चोरानं ।

© Sanjay R.

" महामंत्र जिवनाचा "

रोज सकाळी
उठुन लवकर
कोमट थोडे
पाणी प्यावे ।

माँर्निंग वाकचा
चढवून पेहराव
दुर थोडे
फिरुन यावे ।

गार हवेतले
कण आँक्सिजनचे
छातीत थोडे
भरुन घ्यावे ।

प्राणायाम चे
पाठ थोडे
शात पणाने
गिरवुन घ्यावे ।

आसनांची
शक्ती अफाट
निरोगी थोडे
जगुन घ्यावे ।

राग द्वेष हा
सोडून सारे
आनंदाने खुप
हसुन घ्यावे ।

महामंत्र हा
जिवनाचा
सांगुन सार्यास
सुखी व्हावे ।
© Sanjay R.