Tuesday, November 14, 2017

"मिळेल का हो ते बालपण परत "

झालो आम्ही मोठे जरी
हवं अजुन लहानपण तरी ।
हसणं खिदळणं रुसणं रागावणं
होते दिवस ते कीती भारी ।
मोठेपणाचा आव नुसता
मोठ्यांपेक्षा लहानेच बरी ।
आईचा मार बाबांचा धाक
फिरायचे नुसते दारोदारी ।
कट्टी बट्टी दोस्त दोस्ती
विसर पडायचा जायचे घरी ।
चिंचा बोरे चिमणीचा दात
मारपीट दंगा मस्ती सारी ।
परत मिळतील का हो ती
बालपणातली दिवसं सारी ।
Sanjay R.

Monday, November 13, 2017

" सुनी सुनी "

माझ्या स्वप्नांच्या दुनियेची
आहेस तुच राणी ।
रचेत्यांनी रचलीत ना
कित्तेक तुजवर गाणी ।
तुजविण या संसारी
नसेल प्रेमळ कोणी ।
प्रेयसी तु माझी
छळतेस कीती क्षणो क्षणी ।
आभास तुझा होता मना
घेते धाव तुझ्या मनी ।
नसतेस तु जेव्हा जेव्हा
मन रीते अन सुनी सुनी ।
Sanjay R.

Wednesday, November 8, 2017

" अंगाई "

बाळा तुज गाउ
कशी रे मी अंगाई ।
विशाल या अंगणी
करते गाई गाई ।
उपवाशी तु
उपवाशी तुझी आई ।
भुकेचा हा डोंगर
का तुझ्याच ठाई ।
Sanjay R.

Friday, October 27, 2017

" पेटते चुल "

संसार फाटका
काखेत मुल ।
घालुन फुंकर
पेटते चुल ।
डोळ्यात आसवं
विचारांना हुल ।
दिवस रात्र
भुकेला भुल ।
स्वप्नात बघते
नवी एक चाहुल ।
गुलाब फुलवतो
काट्यात फुल ।
Sanjay R.

Thursday, October 26, 2017

" हवा मला नवाब "

लहानगींनं केला साज
म्हणते कशी मी
दिसते कशी आज .
साडीत ती
दिसते लाजवाब .
ऐट तिची बघा
दिसतो खास रुबाब .
म्हणते कशी आता
हवा मला नवाब .
लहान लहान मुलं ना
नाही त्यांचा जवाब .
Sanjay R.