Saturday, October 14, 2017

" गंगा तु यमुना तु "

सजनी गं चल ना जरा
गावु गोड गुलाबी गाणी .
गुंतला जीव तुझ्यात
होशील का माझी राणी .

अप्सरा तुच माझी
रंभा मेनका काय कोणी .
कानात गुंजते अजुनी
मधुर तुझी ग वाणी .

रंग रुपाचा काय महीमा
भासे त्रैलोक्क्याची जनणी .
गंगा तु यमुना तु
मन तुझे गं निर्मळ पाणी .
Sanjay R.

Friday, October 13, 2017

" वेगाला नाही मर्यादा "

जिवनाची काय किम्मत काही
वेगाला कुठलीच मर्यादा नाही .
क्षणात होइ उध्वस्त संसार
भोग भोगतो सारा परीवार .
पुढेच बसला काळ बघा तो
जिवनात करतो काळा अंधार .
ठेउन भान थोडे आप्तेष्टांचे
व्हा मित्रांनो गाडीवर स्वार .
तुम्हीच तुमचा व्हा आधार
फुलेल जिवन येयील बहार .
Sanjay R.

Saturday, October 7, 2017

" जिवन प्रवास "

दिवस तसा आजचा
किती खास आहे .
तुझ्या आणी माझ्या
मिलनाचा हा प्रवास आहे .

आठवते  ती पहिली भेट
अजुनही तिच आस आहे .
नसतेस ना तु जेव्हा
मनाला तोच ध्यास आहे .

गालात तुझे हसणे
आणी हलकेच रागावणे
तोच तर सहवास आहे .
कसा विसरेल ते क्षण
त्यातच माझा श्वास आहे .

जपलीत मी ती सारी फुलं
त्याच्यासाठी तु आकाश आहे.
फुलं मुलं काळजी किती
घराला तुझाच सहवास आहे .

तु मी आणी आपलं जग
सार्यांचाच तु विश्वास आहे .
रस्ता अजुन सरला नाही
अनंताचा हाच प्रवास आहे .
Sanjay R.

Friday, October 6, 2017

गारवा

आज उद्या परवा
दिवस कुठलाही ठरवा
कधी सुर्याची आग
तर कधी गारवा
Sanjay R.

Thursday, October 5, 2017

" चारोळ्या "

(चारोळी १)

जग हे असच आहे
कोण कुणाचं आहे.

नात्यात किती दुरावा आहे
प्रेम परक्याचे पुरावा आहे .
Sanjay R.

(चारोळी २)

झाडु पोछा
नाही कुठल्या कामाचा

मन करा स्वच्छ
होइल देश अभिमानाचा
Sanjay R.