Thursday, October 5, 2017

" लकीर "

फेबु विचारतो
काय तुझ्या डोक्यात .
काय सांगु त्याला
खुप साठलय खोक्यात .

शब्दांचे तिर
आणी मन भिर भिर .
ह्रुदयावर रेखलेली
न पुसणारी लकीर .

डोळ्यात आसवांची
गर्दी अधिर .
दाटलाय हुंदका तरी
गळा  बेफिकीर ....
Sanjay R.

" रुख रुख "

नांदतात इथे
सुख आणी दुख l
आगळे वेगळे
दोघांचेही मुख l
प्रसन्न हसरा
एकाचा लुक l
बघुन दुसर्यास
वाटे रुखरुख l
Sanjay R.

Thursday, September 28, 2017

"रावण दहन "

गरीब बिच्चारा रावण
जळायला झाला तय्यार
ईतिहासाची फळं भोगतो
बदललेत आता आचार
माणसं झालेत रावण आता
पुरूषोत्तमचाही आला नकार
सीता माता उरली कुठे
पसरला चोहिकडे फक्त विकार
दशासनाचे दहाच अवगुण
माणसात आले सारेच प्रकार
राक्षस हरला देव सरला
पृथ्वीतलावर नुसता विखार
Sanjay R.

" अंतरंग "

नदिच्या काठावर
प्रवाहाच्या लाटेवर
हळुच उठनारे तरंग
अस्वस्थ हे अंतरंग
दूर तो पैलतीर
वाहता वारा अधीर
शुन्न्यात नजर
रीती घागर
डबडबले डोळे
पाण्यात पाणी मीळे
Sanjay R.


Wednesday, September 27, 2017

रेशीम गाठी

तु माझ्यासाठी
मी तुझ्यासाठी
जीवनाच्या या
रेशीम गाठी .
संसार आपुला
आपल्या पाठी
चालेल पुढे येइस्तो
हातात काठी.
Sanjay R