Wednesday, January 11, 2017

" ओढ "

चित्र तुझे बघतांना
झालो मी बेचैन ।
ह्रुदयात तुला ठेवतांना
मिटले दोन्ही नयन ।
थांबउ कशी ही ओढ
तुझ्यातच रमलं मन ।
अपुरं वाटतं आता
विशाल हे गगन ।
श्वासातही शोधतो मी
प्रीतीचा छोटासा कण ।
Sanjay R.

Saturday, January 7, 2017

" कटाक्ष "

चंद्राला जसे वेड
आहे त्याची चांदणी।
माझ्या तु आठवणीत
असतेस क्षणो क्षणी ।

सुंदरता बघ फुलाची
मोहक त्याचा गंध ।
तुझ माझही असच
आहे प्रितीचा बंध ।

ध्यास असतो मनात
तुच मला दिसावी ।
कटाक्ष तिरका तुझा
गोड खुप हसावी ।
Sanjay R.

Thursday, January 5, 2017

" पापणी डोळ्याची फडफडली "

भावना बघ माझी
शब्दांच्या जाळात
अडकली ।
थकलो आता मी
विचारांची गाडी आता
स्टेशनला जाउन
धडकली ।
का आहे मज आशा
हृदयाची काच तर
केव्हाच तडकली ।
येशील का तु कधी
पापणी डोळ्याची
का फडफडली ।
Sanjay R.

" परतीच्या वाटेवर "

" परतीच्या वाटेवर "

आहे हा वळणा वळणांचा थाट
कशी ही खाचखळग्यांची वाट ।
टाकले पहीले पाउल तेव्हा मी
नव्हता आधार कशात ।
पडलो झडलो आणी उठलो
हाती आई बाबांचा होता हात ।
उभा ठाकलो मी पायांवर तेव्हा
रोजच होती एक नवी पहाट ।
घातली पालथी दुनीया सारी
शोधला आनंद मी तयात ।
दुर पाहीले मृगजळ सुखाचे
झाले जेव्हा दोनाचे सहा हात ।
नव्हती उसंत मज एक क्षणाची
जशी सागरात उठणारी लाट ।
नाही उरला त्राण क्षीण झाले श्वास
शोधतो मी आता माझी परतीची वाट ।
Sanjay R.

" चार ओळींची गम्मत "

चार ओळीची बघा गम्मत
शब्दांशी जुळतात शब्द
उकलतो त्यातुन भावार्थ
प्रसवते अनोखी जम्मत
Sanjay R.