Thursday, October 13, 2016

" तुम यादोमे सनम "

आपकी हर अदापे
मर मीटे थे हम ।
हुवे थे आपके जादा
और खुदके कम ।
न थे कुछ सपने
न थे कोइ गम ।
ओठोपे मुस्कुराहट
आखे कुछ नम ।
अब भी वही चाहत
तुम यादोमे सनम ।
Sanjay R.

Wednesday, October 12, 2016

* तरंग "

तुझ्यासारखं कुणी
जिवनात असावं
मीही मग हट्टानं
हलकेच रुसावं ।
तुनेही मला हलकेच
कुशीत तुझ्या घ्यावं ।
राग आणी लोभ सारा
अंतरात विळुन जावं ।
Sanjay R.

" नाव जिवनाची लागेल पारी "

कवितेला तुझ्या
दुखाः ची झालर ।
पुढे अजुन बघ
आहे आनंदाची घागर ।

सुखापुढे दुखः
होते अती भारी ।
हिरमुसलेलं मन
करी जिवन विषारी ।

सुख आणी दुखः
दोन्ही एका दारी ।
नाव जिवनाची
लागेल मग पारी ।
Sanjay R.

" उत्तर प्रश्नाचे "

काही प्रश्नांना
नसते उत्तर ।
प्रश्न भलेही
असो सत्तर ।
शोधता शोधता
सरते जिवन ।
प्रश्नच उरतो
असतो गहन ।
नसता उत्तर
चिंता भारी ।
मनास बोचे
तिक्ष्ण तुतारी ।
शेवटाला मागे
उरते शुन्य ।
धडपड सारी
होण्यास धन्य ।
Sanjay R.

Sunday, October 9, 2016

" जाउ या चला खरेदीला "

आले सणासुदीचे दिवस
जाउ या चला खरेदीला ।
गंपुला शर्ट प्यांट घेउन झाला
निघाला दम वस्तु शोधायला ।
बायकोनं घेतली मोरपंखी साडी
फिरलो बाजार मॅचिंग बघायला ।
जिकडे तिकडे माणसांचाच बाजार
शेवटी कंटाळलो तिथल्या गर्दीला ।
अबोला सांगे घरी आलो तेव्हा
पाकीट मोठ्ठे पाहीजे खरीदायला  ।
Sanjay R.