Saturday, September 24, 2016

थरथराट

बरसतो मेघ जेव्हा
होतो विजेचा लखलखाट ।
गळता थेंब डोळ्यातला
होइ ह्रुदयात थरथराट ।
Sanjay R.

Thursday, September 22, 2016

" नको वाटे म्हातारपण "

होता जन्म माणसाचा
होतो आनंदाचा गजर ।
एक एक येता वाढदिवस
जातात बालपणाचे दिवस ।
येता दिवस जिवनाचे खास
सरतो तारुण्याचा प्रवास ।
येता ग्रुहस्थाश्रमाची वाट
लागे खाचा खळग्यात ठेस ।
उपसतो कष्ट  रात्रं दिवस
देण्या परीवारा सुखचा प्रयास ।
बघतो सुख मुलाबाळात
सुखावतो तयांच्या यशात ।
येता म्हातारपण वयात
दुरावतो स्वजनांच्या प्रेमास ।
अनायास ओघळतात आश्रु
अंताला कसे जिवन भकास ।
Sanjay R.

Sunday, September 18, 2016

" प्रहार "

वाटे हसणे तुझे
उमलते फुल सुंदर ।
पडता नजर त्यावर
घेइ वेधुनी नजर ।

करुनी कटाक्ष तिरका
घेइ वेध जेव्हा तीर ।
झेलता ह्रुदयी वार
मन होते अस्थीर ।

आकाशी जमता नभ
करी कर्कश प्रहार ।
झेप घेता भुतळी
होती वार्यावर स्वार ।
Sanjay R.





Thursday, September 15, 2016

" निरोप श्री गणेशाचा "

बाप्पा निघाले घेउन निरोप
चुकले माकले करु नका कोप ।
लहान थोर सगळ्यांच्या जवळचे
लोभसवाणे किती तुमचे रुप ।
पुजेत मान तुमचाच पहीला
द्यावे आशीर्वाद आम्हास खुप ।
Sanjay R.

हिंदी दिवस

हिंदी अमुची राष्ट्रभाषा
डंका तीचा दशदिशा  ।
करु तीचा प्रचार प्रसार
होतील पुर्ण सार्या आशा ।
Sanjay R.