Thursday, August 18, 2016

" ढग काळा "

बघता बघता
भरले आभाळ
लक्षणं पावसाची
दिसतात पुन्हा ।

येताच वारा
गेले उडुन सारे
नक्षत्राचा खेळ
आहेच हा जुना ।

कधी गरजतो
कधी बरसतो
वाटेकरी आसवांचा
काय त्याचा गुन्हा ।

शुभ्र आकाशी
ढग निळा काळा
भासे एकाकी
कसा सुना सुना ।
Sanjay R.

Wednesday, August 17, 2016

" विचारांच काहुर "

विचारांचं काहुर
मनात जेव्हा उठतं ।
बंद होतात दारं
तनही अशांत होतं ।
विचारांच चक्र
जोरात मग धावतं ।
मिटताच डोळे घट्ट
क्षणात सारं विसावतं ।
घेता शांत चित्तानं
हळुच छान सुखावतं ।
कपरान कोपरा मनाचा
प्रफुल्लीत झाल्याचं जाणवतं ।
ध्यानाची महीमाच अशी
जिवनात आनंद डोकावतो ।
Sanjay R.

Sunday, August 14, 2016

" रोजच उपवास "

मनी एक ध्यास
सोबत विश्वास ।
एक एक श्वास
जिवनाचा प्रवास ।

खळगी पोटाची
रोजच उपवास ।
भुकेचे कीती मोल
डोळ्यात आस ।

का कुणास
पैसाच खास ।
नको नाती गोती
लोभ मानवास ।

ना उरली माणुसकी
लागे ओठचा घास ।
तहान तया रक्ताची
झाले सारे राक्षस ।
Sanjay R.

Saturday, August 13, 2016

" मन फुटकी घागर , लागे भराया सागर "

मन अधर अधर
पाण्याची फुटकी घागर ।
भरा कीतीही तयासी
मागे अख्खाच सागर ।
देता थोडके सादर
चाले सदा ची घरघर ।
दुखाःचा नाही तोटा
डोळी आसवांचा पुर ।
सुख क्षणाचा सोबती
घेतो जगुन मधुर ।
Sanjay R.

Friday, August 12, 2016

" मस्तीत जगायचं "

मनाचं काय
कसं कुणी सांगावं ।
क्षण सुखाचे
आनंदात छान रहावं ।
गीत सुमधुर
ओठात गुणगुणावं ।
हास्याची छटा
प्रसन्न मुख भासावं ।
व्यक्त होतांना
खळखळुन हसावं ।
क्षण जिवनाचा
मस्तीत जगावं ।
Sanjay R.