Wednesday, July 27, 2016

" कसम "

आओ करे हम
साफ सफाइ ।
गंदगी ना रहे
इलाके मे कही ।
चाचा चाची
बहन भाइ ।
सबने मिलके
स्वच्छता लाइ ।
स्वच्छ भारत की
कसम खाइ ।
Sanjay R.

Tuesday, July 26, 2016

" स्वच्छ भारत देश महान "

आव्हान करी
पंत प्रधान ।
लागले कामी
मोठे लहान ।
कचरा कुंडी
सरली घाण ।
नद्या नाले
निर्मळ छान ।
स्वच्छ भारत
आमची शान ।
माझा भारत
देश महान ।
Sanjay R.

Sunday, July 24, 2016

" उमलली एक कळी "

उमलली चेहर्यावर
हास्स्याची एक कळी ।
खुलुन दिसते बघ
तुझ्या गालावर खळी ।

हिच तर अदा तुझी
वेडावते मला ।
भिरभिरते नजर माझी
शोधते फक्त तुला ।

बघताच रुप तुझे
होती जागे तराणे ।
प्रित तुझी माझी
आणी गुंजते प्रेमगाणे ।
Sanjay R.

" गोड गळा "

गोड गळा
कपाळी टीळा ।
मुखकमला वरी
हास्य खळखळा ।

नेत्रात आशा
आनंदाच्या कुशा ।
उत्साह मनात
उधळण दश दीशा ।

हलकेच वारा
कधी पाउस धारा
मनाचा पिसारा
मेघ नाचे जरा ।
Sanjay R

Friday, July 22, 2016

" प्रेम विचारांचा सागर "

प्रेम
विचारांचा अथांग सागर
आनंदाचा जागर ।

प्रेम
हवी हवी वाटणारी ओढ
स्वप्नातली जोड ।

प्रेम
मनात खुलणारी नाजुक कळी
जशी गालावरची खळी ।

प्रेम
आईचा वात्सल्ल्याचा झरा
तान्हुल्यास ह्रुदयाचा कोपरा ।

प्रेम
प्रितीचा अतुट बंध
घेतला लिहायला तर होइल निबंध ।

Sanjay R.