Saturday, July 25, 2015

" सुगंधीत दश दिशा "

माणसाचं जिवन ही अशीच
एक कविता आहे ।
कधी  शब्दांनीच बहरणारी
तर कधी घायाळ होणारी आहे ।
Sanjay R .

मनात आशा
नाही निराशा ।
फुलतो गुलाब
सुगंधी दश दीशा ।

निघता शोधाया
एक शब्द ।
अवतरते कविता
झळकते प्रारब्ध ।

तुझ्या माझ्या प्रितीचा
असा एक धागा ।
दुर असतांना आपण
नुसता मनात त्रागा ।

असेल जर का
कवितेचा मोह ।
शोधायचे शब्द
उलथुन डोह ।
Sanjay R

Friday, July 24, 2015

" सागर मनातला "

सागर मनातला
नेहमीच अशांत ।
बसुन काठावर
गप्पा निवांत ।
येणारी लाट
नवा सिद्धांत ।
सरले शब्द
हरवला प्रशांत
Sanjay R.

चलो चले कही दुर
देख कुछ अब आते है।
कोइ तो हो कही
याद हमे करता होगा ।
अब तो गुजरा जमाना वो
देख उन्हे जब खो जाते थे ।
यादे उनकी भरी पडी है
देखो अब भी जान अडी है ।
लौटा देते कुछ उनकोभी
सासे अब भी रुकी पडी है ।
Sanjay R.

आहे का कुणाकडं थोडा वेळ ।
खेळु या सारे आपण एक शब्दांचा खेळ ।
जोडुन शब्दांना करु या शब्दांची भेळ ।
गोड आंबट होइल थोडी  मसाला स्मेल ।
बघु या काय होतं हा शब्दांचा खेळ ।
Sanjay R .

Thursday, July 23, 2015

" होउ दे भजी "

येउ दे पाउस
कितीही जोरात ।
पडु दे त्याला
त्याच्याच तोर्यात ।
येउ दे पाणी
वाहु दे पुरात ।
मुलांना करु दे
मस्ती दारात ।
फाटकी छत्री
मी बसतो घरात ।
गरमा गरम भजी
होउ दे जोरात ।
Sanjay R.
☔☔☔��☔☔☔

" बरस रे पावसा "

बरस रे पावसा
खुप तु बरस ।
शांत कर धरा
झालं आता वरस ।
घेउन ढगांना
थोडा तु गरज ।
आम्ही आहोत खाली
थांबु नको वरच ।
लोटु दे पुर
येउ दे धारच ।
सारेच थकलो
आहे तुझी गरज ।
आनंदानं हसायला
हवी तुझी सरच ।
Sanjay R.

" कडकडाट तीचा "

रात्री तीनं तर
उच्छादच मांडला ।
सारखी मधुनच
कडाडत होती ।
लखलखाट तिचा
घाबरवत होती ।
सोबतीला त्यचाही
गडगडाट होता ।
भितीचं वातावरण
जिवात जीव नोता ।
रात्र अंधारी आणी
पावरही नव्हता ।
मधेच काही सरींनी
रडुन घेतलं ।
बळीराजानं मनात
हसुन घेतलं ।
Sanjay R.