Monday, June 1, 2015

मन हे असच

खर सांगु का
मनातल माझ्या ।
बघुन तस्विर तुझी
शोधतो काय
डोळ्यात तुझ्या ।
तार ह्रुदयाची वाजे
गुणगुणतो कनी वाजा ।
Sanjay R.

शोधतो उत्तर मी
प्रश्नाच का तुझ्या
घोर लावलास जिवाला
तुच मनात माझ्या ।
Sanjay R.

दे झुगारुन
बंधन सारे ।
तुटका विश्वास
नको पसारे ।
चमचमत्या रात्री
कितीक तारे ।
हळव्या मनात
बोचरे वारे ।
डोळ्यात आसु
आणी बंद दारे ।
Sanjay R.

घेउन तुज
मिठीत माझ्या
चुंबन तुझे
घ्यायचे मज ।
स्पर्श सुखाचा
बंध मनाचा
एक रुप
करायचा मज ।
Sanjay R.

Friday, May 29, 2015

" दुखः "

दुखाःला कुठे
वाट असते ।
ह्रुदयात गर्दी
अफाट असते ।
मनात जेव्हा
विचार डोकवतात
नेत्रात आसवांची
फक्त लाट असते ।
Sanjay R.

Monday, May 25, 2015

" भास आभास "

बघ एकदा तु अंतरात
वसलाय तिथं माझा श्वास ।
प्रत्येक आठवणीस तुझ्या
जाणवेल तुज माझा भास ।
Sanjay R.

नाही कुठले भास
नाही मनी आभास
फक्त तुझ्यासाठी घेतो
ह्रुदयी एक एक श्वास ।
Sanjay R.

प्रीत तुझी माझी
जशी राघु अन मैनेची ।
याद येताच बघ
कनी वाजते शीळ मंजुळेची ।
Sanjay R.

का रे असा छळतोस
लावलेस वेड का मजला
प्रत्येक क्षणी तुच तु
कसे समजाउ मी मनाला
Sanjay R.

दे झुगारुन
बंधन सारे ।
तुटका विश्वास
नको पसारे ।
चमचमत्या रात्री
कितीक तारे ।
हळव्या मनात
बोचरे वारे ।
डोळ्यात आसु
आणी बंद दारे ।
Sanjay R.


उन्हाचा मारा
घामाच्या धारा ।
अंग भाजतय
नाही किनारा ।
आटलय पाणी
कोरडा पसारा ।
पोटाची आग
जन्म सारा ।
नशिबाचे भोग
प्रकाशात तारा
Sanjay R.







Thursday, May 21, 2015

गुलाब फुला

सु गंधीत तु
गुलाब फुला ।
नाही मुक्ती
प्रेमातुन तुला ।
हलवायचा आता
दरवर्षी झुला
Sanjay R.

गातात कोणी
आपलेच रडगाणे ।
दुसरे दाखविती
इतरांचे दुखणे ।
असते कवितेत
सुख दुखाःचे लेणे ।
आरसा जिवनाचा
शब्दांचे तराणे ।
Sanjay R.

Tuesday, May 19, 2015

कविता

कविंचे आहेत
प्रकार दोन ।
गातात येक
आपलेच रडगाणे ।
दुसरे दाखविती
इतरांचे दुखणे ।
असते कवितेत
सुख दुखाःचे लेणे ।
आरसा जिवनाचा
शब्दांचे तराणे ।
Sanjay R.