Friday, February 20, 2015

" मला तु सावर "

घालु कसा मी
माझ्या मनाला आवर ।
तुच ग प्रिये आता
मला तु सावर ।

काजळाची कोर
छेडते मनाची तार ।
तुजविण मी असा
ह्रुदया वरी प्रहार ।

लाल चुटुक ओठ तुझे
देइ मजला पुकार ।
श्वास अंतरी थांबला
घालुन फुंकर दे तु आधार ।
Sanjay R.

Tuesday, February 17, 2015

" ओम नम: शिवाय "

गुंजतो नाद कानी आज
ओम नम: शिवाय ।
बेल फुल दही दुध पुजेला
शिव आराधनेचा उपाय ।
वाहन नंदी सोबती नाग
कैलाशावरी पाय ।
भोलेनाथ भोळा जरी तो
असे रौद्र शक्ती रुपाय ।
Sanjay R.

नाजुक साजुक
रुपवान गुणवान
काय वर्णावे फुलाला ।
जन्मापासुन अंता वरी
सोबती असा
देइ आनंद मनाला ।
Sanjay R.

" मैत्री "

तुझ्या  आणी माझ्यात येक
आहे आगळेच मैत्रिचे नाते ।
कधी रुसवा तर कधी अबोला
ओढ अशी मग एकमेका
जवळ तीच घेउन येते ।
होतो दुरावा जेव्हा
हुरहुर मनी लागते ।
निश्चय निखळुन पडतात
बोलचाल सुरु होते ।
मलाही उमगल आता
मैत्री अशीच असते ।
सुख दुख: येक होतात
मैत्री मैत्रीलाच जागते ।
Sanjay R.

Sunday, February 15, 2015

" ज्ञानी व्हाव "

वेड साहित्याच
कस असाव ।

वाचन लेखनात
वेडं व्हावं ।

द्वार ज्ञानाच
खुल करावं ।

सकळ जनांनी
ज्ञानी व्हावं ।
Sanjay R.

" निरंतर ही लता "

काउन रे देवा
अस काउन केल ।

आम्हालाच का
म्हातारपन दील ।

लहानपनच बर होत
मोठ्ठे आता झालो ।

नाही परत मिळणार
सगळच गेल ।

हालच आहेत जिवाचे
कर काही भलं ।
Sanjay R.

काय कशी वर्णावी
प्रेमाची ही गाथा ।

इतीहासातही प्रचलीत
नाना विधी कथा ।

झेलल्या कितीकांनी
अगणीत व्यथा ।

परी प्रेमाची बहरते
निरंतर ही लता ।

वेड म्हणावे यासी
कि भावनेची चिता ।

हळुवार मनाची
सुरेख संदर गिता ।

भावबंध जुळवीतो
तोची कर्ता करवीता ।
Sanjay R.

जळतील आठवणी
ह्रुदया संगे ।
मनात होतील
वाचारांचे दंगे  ।
ताल सुरा विन
का मैफिल रंगे ।
Sanjay R.

लेखणीची धार
अनुभव अपार ।
चांगल्या वाइटाचा
नकोच विचार ।
विनाकारण होतो
डोकयाला भार ।
लिहायच मनातल
विसरायचे वार ।
Sanjay R.