Saturday, January 10, 2015

" पालवी "

अम्रुत तुल्य ती पहिली वर्षा ।
त्रुप्त धरा अन दाही दिशा ।
रुजती बिज अन फुटे पालवी । 
काय वर्णावी निसर्गाची सुशा ।   
Sanjay R.

बोलायच असेल तर
जिभेला हवी धार ।
आणी
शब्दच नाही सुचले तर
ह्रुदयावर पडतील प्रहार ।
Sanjay R.

घेउन हात तुझा हाती
केलय मी तुज माझी साथी ।
म्हणतात ना सारेच
तोच ठरवतो ही सारी नाती ।
Sanjay R.

सोबत हवी मज तुझी
नाही कुठला ध्यास ।
संगतीन तुझ्या मग होयील
हा एकट्याचाच प्रवास ।
Sanjay R.

" आधार "

जिवनात वळण येती चार
निघालो होउन मी त्यावर स्वार ।

बाल्यावस्था होती गोड फार
आई दिलास तु मज आधार ।

युवावस्थेत भेटली मीत्र अपार
बाबा नव्हता तुमचा कशास नकार ।

ग्रुहस्थावस्थेत मी आता
पार पाडीतो कर्तव्य माझे
सोबतीला आहे परिवार ।

कशी असेल व्रुद्धावस्था
पडला मोठा मज विचार ।

विसरतात सारे का व्रुद्ध आईबापा
झेलावे लागतील मजही ते प्रहार ।
Sanjay R.

Saturday, January 3, 2015

" सोबत "

घेउन हात तुझा हाती
केलय मी तुज माझी साथी ।
म्हणतात ना सारेच
तोच ठरवतो ही सारी नाती ।
Sanjay R.

सोबत हवी मज तुझी
नाही कुठला ध्यास ।
संगतीन तुझ्या मग होयील
हा एकट्याचाच प्रवास ।
Sanjay R.

लागतील सोसावे
परिणाम विनाकारण ।
करता गैरसमज दुर
आनंदी होतील क्षण ।
Sanjay R.

सांगतात ते
मराठी वर्ष पाळतात ।
तारीख विचारताच
इंग्रजी महिन्यातिलच सांगतात ।

Thursday, December 25, 2014

" निळ्या आकाशी "

निळ्या निळ्या आकाशी
निघाला बगळ्यांचा थवा ।
डोंगराआड दुर जाणारा सुर्य
त्यलाही बघा एकांत हवा ।
संथपणे वाहणारा वारा
विसावतो घेउन गारवा ।
Sanjay R.

खुणावते नजर तुझी
धुंद करी का मजला ।
ओठ माझेही अधीर झाले
चुंबन देण्या ग तुजला ।
गोड गुलाबी गाल तुझे
करी इशारा माझ्या मनाला।
काळ्या केसांची सुंदर बट
जागवते ओढ क्षणा क्षणाला ।
Sanjay R.

Sunday, December 21, 2014

" आठवणी "

स्तब्ध बसला असतो मी
डोळे लाउन तुझ्या वाटेवर ।
चाहुल तुझी लागताच
आनंद झळकतो मनावर ।
Sanjay R.

आठवणीत तुझ्या मी
साद तुझीच घेतो ।
नसतांना तु मग ।
स्वप्नांना उजाळा देतो ।
Sanjay R.

मी तुझा नी तु माझी
नाही मधेच कोणी ।
मनात बिंबवलं तुज
गाऊ प्रेमची गाणी ।

गंध केवड्याचा पसरला
मधेच डोकावतो मोगरा ।
मन फुलारले आता
दिसे निशीगंधही साजरा ।

होइल सारं मनातल
येईल प्रेमाला भरती ।
गोल आहे ही धरा
जाऊ भेटुनच वरती ।
Sanjay R.