Sunday, December 14, 2014

" विश्वास "

पर्वतरोही सारे आपण
सर करायचा आहे गड ।
मनात आत्मविश्वास हवा
कहीच जाणार नाही जड ।
Sanjay R.

अपने ना रुठे कभी
इरादे ना हो झुटे कभी ।
बात ना रुके कभी
दिल ऐसे ना तुटे कभी
Sanjay R.

Thursday, December 11, 2014

" ओझं "

भुत संशयाच
मानगुटीवर बसल ।
गाडं जिवनाचं
तिथच फसलं ।
भोगायच स्वता:लाच
कोणी कितीही हसलं ।
नशीबाचा खेळ सारा
कुणास ठाउक का ते रुसलं ।
लपवतो सारी दुखः
ह्रुदयात बघा सारच ठुसलं ।
Sanjay R.

मणभर ओझ घेउन डोक्यावर
निघतो रोज मी जगायला ।
थकलो कुठ ठेउ ओझ आता
मंद झालेत श्वास तरायला ।
Sanjay R.

Wednesday, December 10, 2014

" खडे जिवनातले "

मनात नाही काहीच
नजर लागली शुन्याकडे ।
असतांना लहान आम्ही
गिरवायचो खुप पाढे ।
वाटत चुकल असेल गणीत
जिवनात आहेत कीती खडे ।
सुख: दुख : सोबती इथे
जुळवायचे  इथे आयुष्यातील तडे ।
Sanjay R.


कशातच नाही लागणार
अशान मन माझं ।
सदैव असेल प्रतिक्षा मज
केव्हा बदलेल मन तुझं ।
Sanjay R.

Tuesday, December 9, 2014

" दुनीया आहे गोल "

बोल बाबा तुच बोल
आहेना ही दुनीया गोल ।
बघ जरा दुरवर
नाही इथ माणसाच मोल ।
जिवावर उठलेत सारे
दुनीया आहे गोल ।
प्रत्येक झण स्वार्थी इथला
खिशाला आहे मोठे होल ।
लुबाडतात एकमेका
दुनीया आहे गोल ।
जायचे आहे कळत सार
तरीही मन अगदीच झोल ।
नेतील का सोबत सार
दुनीया आहे गोल ।
Sanjay R.

ना कळे मजला काही
काय अशी ही जादु झाली ।
बघता बघता नजरेपुढेच
सावली अंधारात लुप्त झाली ।
शब्द मनातले मनात उरले
ओठांचीच मग फत्ते झाली ।
Sanjay R.


न जाने आज क्यु
दील उदास था
याद उनकी आतेही उनके
ना होने का एहसास था ।
दील तो मान गया अब
पर आखोंको उनका
अब भी इंतजार था ।
Sanjay R.

Tuesday, December 2, 2014

" वेड्या मना "

हास्यात कीती सुख असत
दुखः फार फार दुर असत ।
मनात काही काही नसत
सुखाच हेच मुळ असत ।
Sanjay R.

कसाग तुझा हा अबोला ।
राग का ग नाही गेला ।
विसर बघु आता सार
मनच दिलय मी तुला ।
Sanjay R.

वेड्या मना
कारे तु वाट पाहतोस ।
सरली वेळ आता
आतल्या आत तुच जळतोस ।
Sanjay R.

ठेउन मला इथ
पुढ तु निघालास ।
विचार माझ्या मनाचा
का नाही करवलास ।
देवा फक्त एकदा रे तु
बोलव तुझ्या दर्शनास ।
जपील माळ मी
अर्थ लाभेल जिवनास ।
Sanjay R

वाट गाडीची पाहतो
धिर नाही धरवत ।
असंख्य लोंढे माणसांचे
का कुणालाच नाही जाणवत ।
Sanjay R.