Saturday, September 6, 2014

" वेड्या मनाची काय ही कथा "

ख्वाब हो अगर दिलमे ।
सब कूच दिल को भाता है ।
सोचो जो भी आप ।
सामने बस आ जाता है ।
Sanjay R.


मिळता दाद कवितेला
मुठभर मास चढते आम्हा ।
लिहून परत एकदा
ऐकवतो बघा तुम्हा ।
Sanjay R.


वेड्या मनाची काय ही कथा ।
जिथे जिथे जाईल
तिथे आपलीच व्यथा ।
कधी बघत बसेल वाटा ।
‘तर कधी पिटत बसेल माथा ।
काय मनात त्याच्या कुणास ठाव ।
लिहायची म्हटल तर होईल गाथा ।
Sanjay R.

गालावर तूझ्या
काळ्या केसांची बट ।
घायाळ करी मज
नजरेचा कट ।
Sanjay R.

Thursday, September 4, 2014

" देवा सुखाचे बाळकडु दे "

देवा काय मागायच तुला ।
तुझ्या पुढ हात फक्त जोडु दे ।।
प्रत्येकाच्या मनात
असेल नसेल जर काही ।
देवा तु तसेच सारे घडु दे ।।
पायाशी तुझ्या मागेल कोणी ।
कळसा कडे त्यासी वर चढु दे ।।
नको मजसी काहीच ।
सगळ्यांना सुखाचे बाळकडु दे ।।
Sanjay R.

" हातात हात "

होती तुझी साथ
हातात होता हात
नव्हते जे मनात
घडले सारे क्षणात ।
Sanjay R.

चांदण्या रात्री
बघते चांदणी वाट ।
हळुच डोकावतो चंद्र
घेउनी पौर्णिमेचे ताट ।
Sanjay R.


" मोरया "

मंगल मुर्ती मोरया ।
गजानना लंबोदरा ।
विनायका सिद्धेश्वरा ।
तुम्हीच आता क्रुपा करा ।
दुराचारी बहु आनंदी 
व्यथीत झाली  ही धरा ।
सिंचीती कष्टकरी घाम
दुखः तयांची तुमहीच हरा ।
Sanjay R.

दुआ हम भी मांगेंगे भगवानसे
भर दे दामन आपका खुशीयोसे
हसरते पुरी हो आपकी शानसे
हो सकेतो मिला दे अपनी जानसे ।
Sanjay R.


Tuesday, September 2, 2014

" निशास्वप्न "

तस्वीर तुझी बघुन
मनाला मी समजवतो ।
तुच स्वप्नपरी माझी
निशास्वप्न मी सजवतो ।
Sanjay R.

प्रत्येक अदा तुझी
खुणावते मनाला माझ्या ।
बेधुंद मन होत
स्थिरावत विचारांत तुझ्या ।
Sanjay R.