Sunday, February 23, 2014

" जिवन असच संपणार आहे "

शब्दांशी जुळल तर होते कवीता
नाहितर बघा रागावते सवीता ।
आठवणींचा डोंगर करावा रीता
कदाचीत त्यान हसेल स्मीता ।
खरं सांगेल मी घेउन गीता 
सुस्मीते आहे तुझीच ग ही कवीता ।
Sanjay R.
 


कुणाला काय सांगाव
जिवन असच संपणार आहे
काय हवं काय नको
चिंता का कधी सरणार आहे
दिवसा मागुन दिवस जाताहेत
कोण सुर्यासी धरणार आहे
इच्छा आकांक्षा दुनियेच्या
घेउन चिंता मी मरणार आहे
Sanjay R.


निघालो सारे आम्ही प्रवासाला
लक्ष ठेवीले प्रथम विकासाला
जंगल झाडे नद्या नाले पशु
पक्षी जिव जंतु
नाही कुणीच विचाराला
वाढवायचे आहे काॅक्रीट जंगल
ठेवीली शेतं आता सुकायाला
पोटा पाण्यचा प्रश्ण बिकट
बळीराजा आला शहराला
Sanjay R.

घे दिली तुज कटकट
दिवस रात्र वटवट
थोडीशी आहे नटखट
शुभ मुहुर्त आहे जवळ
उरकुन घे झटपट
Sanjay R.


खंत मनात अजुनही बाकी
करायच काय होत
आणी काय करुन बसलो
असतांना लहान मी वाटायच
व्हाव मस्त पोलीस
हाती बंदुक घेउन
चोरांच्या माग धावाव
ढुशुम ढुशुम करून
लोकांचा आवडता
हीरो बनाव ।।

शाऴेत असतांना वाटायच
मास्तर व्हाव
छडी घेउन सगळ्यांना
खुप रडवाव ।।

 अजुन थोड मोठ होताच
वाटायच तस्कर
सोन्यचा व्हाव
सोन्याच्या बिछान्यावर
आरामात लोळाव ।।

नंतर वाटायच
शास्त्रज्ञ व्हाव
कुणी नसेल शोधल
ते आपण शोधाव
न्युटन सारख आपल पण
नाव कराव ।।

 कधी वटायच
डाॅक्टर व्हाव
गरिबांना फुकटात
औषध द्याव
सगळ्याना खुप
आनंदी कराव ।।

 काही करायची वेळ आली
तेव्हा वाटल
शेती संशोधक होउन गावी
शेतात काम कराव ।।

सगळ मनातल
मनातच राहील
आणी ईंजिनीअर
होउन शिकलो
मनातल मनात
कस ठेवाव
Sanjay R.



मन उदास असलेना
कि आभाळ भरुन येते
आणी विज कडाडताच
नेत्रातुन बरसु लागते
धरतीला सोइरसुतुक नसते
पाण्यात मस्त चिंब भिजते
हवेच्या झोक्यासंगे हलकेच
अंग झुलवत आनंदान हसते
sanjay R.


सम्मती दीली शेवटी
मनाला स्वच्छंद विहरण्या ।।
Sanjay R.


का जगणे असतो येक छळ
मग मरणाने होते सुटका
आनंदात जिवन जगा
सहजतेन पार होइल नौका
sanjay R.


नकोच त्या आठवणी
काढावी येक तर
असंख्य पुढ्यात येउन
मनात करतात घर
जिवनच नकोस होत
मनात दुंखाःची भर
sanjay R.


काय वर्णावे
तुझे सौदर्य
डोळे दिपवणारे
तुझे लावण्य
बघत रहावस
खुप वाटल
नाही जमल मला
स्वतः ला तुझ्या
नेत्रात निरखण
नजरेला तुझ्या
नजय भिडवण
ओठांना तुझ्या
ओठांनी टिपण
राहुनच गेले
तुझा हातात
हात घेण
परत मेटीची
आशा जागवण
कुणास ठाउक
कळल का तुला
मनातल दुखण
आवडेल मला
परत परत भेटण
sanjay R.


साथ सोबत माझी तुला
नाही इतकी दुर
गाणे जिवनाचे सजवु
येक ताल नी येकच सुर
sanjay R.



 

Sunday, January 26, 2014

" अशांत वारा "



हेची जिवन असे
चुकेल कुठे कुणा कसे
भोग भोगुनी निघता प्रवासाला
सोबतीला कोणी नसे
Sanjay R.


जमली होती गर्दीही खुप
गळ्यात होत्या माळा पडत
फुलांची तर गिणतीच नव्हती
उभ्या आयुष्यात जे झाल नाही
ते आडव्या आयुष्यात घडत होत !
Sanjay R.


माणुस अवतरतो आई संगे !
अंताला निघतो चौघांसंगे !
जगतो मात्र तुम्हासंगे !
वर असतो कुणासंगे !
Sanjay R.


पाजाया अम्रुत
भरुन आणला
त्यांनी एक माठ !
नशीबच फुटके
मार दगडाचा
लागली सार्यांची वाट !
Sanjay R.


मन माणसाच
असच असत !
जे आपल नसत
नेमक तेच हव असत !
फुल असत गुलाबाच
आम्हा तेच आवडत !
Sanjay R.


छंद असे हा कुणाचा
काळजातली भावना
मोकळी करायचा !
नियमांना हलकेच
बाजुला सारायचा !
मनात येयील ते
लिहुन काढायचा !
जमलेच तर
लोकांसी ऐकवायच !
नाही तर ....
आपणच आपला
आनंद मिळवायचा !
नाही कुणाची धास्ती
ना कुणाला जबरदस्ती !
पटेल त्यान वाचाव !
नाही तर परत
आमच्याकड साराव !
तुमची असेल ती कवीता
प्रीय आम्हा आमची सवीता !
Sanjay R.


हाईकु.......

लिखे कायकु
करो बात दिलकी
बने हाईकु
Sanjay R.


क्षण आनंदाचा
मन सुखाउन गेला !
आनंद इतका की
गगनात घेउन गेला !
Sanjay R.


रागाचा पारा
अशांत वारा
यांस देताच थारा !
जिवनाचा खेळ
बिघडतो सारा !
Sanjay R.

कुठे आहेस तु राजा
बघतोस दुरुन तु मजा !
छळणार किती तु मजला
नाही सोसवत ही सजा !
चल घेउ दुर भरारी
ह्रदयात आहेस तु माझ्या !
Sanjay R.


उमटता सुर बासुरीचे
भिनला नाद रोमरोमात !
उल्हालाने हलली धरा
भरले प्राण पैंजणात !
Sanjay R.


जिवनात महत्वाची
मैत्रीची ही जोडी !
आयुष्य भर वसु दे
तिळगुळाची गोडी !!
Sanjay R.

नाही कोणी श्रीमंत
नाही कोणी गरीब !
लेकर आपण त्याची
आओ सब करीब !
Sanjay R


ओळी काय चार असो वा दोन
बंध जुळला तर मनाशी जुळतात
नाही च जुळला तर दूर लोटून
घर करून बसतात
sanjay R.


रंग तरंग
सत्संग विहंग !
संग भंग
ढंग बेढंग !
sanjay R.

Monday, January 6, 2014

" काळ्या कुट्ट अंधारात "

काळ्या कुट्ट अंधारात
येक काजवा चामकावा |
अबोला तुझा माझा
तसा क्षणात संपावा |
Sanjay R.



Photo: काळ्या कुट्ट अंधारात
येक काजवा चामकावा |
अबोला तुझा माझा 
तसा क्षणात संपावा |
Sanjay R.













कौन अपने कौन पराये
मुश्कील है ये जानना |
दे जाते धोका आपनेही
परायो की क्या केहेना |
Sanjay R.