Sunday, January 26, 2014

" अशांत वारा "



हेची जिवन असे
चुकेल कुठे कुणा कसे
भोग भोगुनी निघता प्रवासाला
सोबतीला कोणी नसे
Sanjay R.


जमली होती गर्दीही खुप
गळ्यात होत्या माळा पडत
फुलांची तर गिणतीच नव्हती
उभ्या आयुष्यात जे झाल नाही
ते आडव्या आयुष्यात घडत होत !
Sanjay R.


माणुस अवतरतो आई संगे !
अंताला निघतो चौघांसंगे !
जगतो मात्र तुम्हासंगे !
वर असतो कुणासंगे !
Sanjay R.


पाजाया अम्रुत
भरुन आणला
त्यांनी एक माठ !
नशीबच फुटके
मार दगडाचा
लागली सार्यांची वाट !
Sanjay R.


मन माणसाच
असच असत !
जे आपल नसत
नेमक तेच हव असत !
फुल असत गुलाबाच
आम्हा तेच आवडत !
Sanjay R.


छंद असे हा कुणाचा
काळजातली भावना
मोकळी करायचा !
नियमांना हलकेच
बाजुला सारायचा !
मनात येयील ते
लिहुन काढायचा !
जमलेच तर
लोकांसी ऐकवायच !
नाही तर ....
आपणच आपला
आनंद मिळवायचा !
नाही कुणाची धास्ती
ना कुणाला जबरदस्ती !
पटेल त्यान वाचाव !
नाही तर परत
आमच्याकड साराव !
तुमची असेल ती कवीता
प्रीय आम्हा आमची सवीता !
Sanjay R.


हाईकु.......

लिखे कायकु
करो बात दिलकी
बने हाईकु
Sanjay R.


क्षण आनंदाचा
मन सुखाउन गेला !
आनंद इतका की
गगनात घेउन गेला !
Sanjay R.


रागाचा पारा
अशांत वारा
यांस देताच थारा !
जिवनाचा खेळ
बिघडतो सारा !
Sanjay R.

कुठे आहेस तु राजा
बघतोस दुरुन तु मजा !
छळणार किती तु मजला
नाही सोसवत ही सजा !
चल घेउ दुर भरारी
ह्रदयात आहेस तु माझ्या !
Sanjay R.


उमटता सुर बासुरीचे
भिनला नाद रोमरोमात !
उल्हालाने हलली धरा
भरले प्राण पैंजणात !
Sanjay R.


जिवनात महत्वाची
मैत्रीची ही जोडी !
आयुष्य भर वसु दे
तिळगुळाची गोडी !!
Sanjay R.

नाही कोणी श्रीमंत
नाही कोणी गरीब !
लेकर आपण त्याची
आओ सब करीब !
Sanjay R


ओळी काय चार असो वा दोन
बंध जुळला तर मनाशी जुळतात
नाही च जुळला तर दूर लोटून
घर करून बसतात
sanjay R.


रंग तरंग
सत्संग विहंग !
संग भंग
ढंग बेढंग !
sanjay R.

No comments: