Saturday, August 29, 2020

" शेतकरी "

मी आहे शेतकरी
कर्माने मी कष्टकरी ।
राबतो मी दिवस रात्र
जीवन माझे हातावरी ।

नेहमी नजर आकाशात
भीती असते अंतरात ।
निसर्गाचे चक्रच न्यारे
झेलतो सारेच मी आघात ।

बांधावरती होऊन उभा
बघतो जेव्हा स्वप्न सुखाचे ।
मागून येऊन धडक मारते
जीवन माझे आहे दुःखाचे ।

रक्ताचे मी करतो पाणी
लुटून नेतो दुसराच कोणी ।
भोग भोगतो शेतकर्यांचे
डोळ्यातही मग नसते पाणी ।
Sanjay R.

No comments: