आहेस तु माझ्या
स्वप्नातली परी ।
छंदच जणु जडलाय
राणी माझी तुच खरी ।
Sanjay R.
उत्सुकता लागली मनाला
असेल कशी तुझी छवी ।
साकारली स्वप्नात माझ्या
सदा वाटते हवी हवी ।
Sanjay R.
आहेस तु माझ्या
स्वप्नातली परी ।
छंदच जणु जडलाय
राणी माझी तुच खरी ।
Sanjay R.
उत्सुकता लागली मनाला
असेल कशी तुझी छवी ।
साकारली स्वप्नात माझ्या
सदा वाटते हवी हवी ।
Sanjay R.
मनी विचार आहेत अपार
सोसवत नाही त्यांचा भार ।
सरसावतो लिहीण्या ओळी चार
लेखणीची मात्र तुटते तार ।
Sanjay R.
स्वच्छंद कवी आम्ही
नाकळे नियम सारे ।
हव्यास नाही प्रसिद्धीचा
नकोत आम्हा हार तुरे ।
मिळतो आनंद मनाला
बस इतकेच आम्हास पुरे ।
Sanjay R.
नटुन थटुन सजला बघा
भुतलावरी हा रंगमंच ।
शोधायची कुठे माणुसकी
का मुकपणान जपायची ।
Sanjay R.
चला आज आहे संडे
गिरउ या काही फंडे ।।
अनमोल हे जिवन आहे
जगण्याचे बहु हतकंडे ।
Sanjay R.
इंतजार करते करते आपका
हम युही सो जाते है ।
आती नही निंद ना आप
बस ख्वाबोमे खो जाते है ।
Sanjay R.
जिवन असे रंगी बेरंगी
नवरंगांच्या नउ छटा ।
काम क्रोध मोह माया
जश्या शंकराच्या जटा ।
Sanjay R.
जिवनी असे या
सुख दुखा:च्या वाटा ।
कधी वाहे रक्त
टोचता छोटासा काटा ।
Sanjay R.
जानते है हम
चांदभी तडपता है
साथ पानेको चांदनीका ।।
पहचान गये आज हम
कोइ करता याद हमे
अंदाज बहोत गहराइयोका ।।
Sanjay R.
दोस्ती आपकी जो मिली हमे
ना रही तमन्ना कुछ बाकी ।।
पाया हमने दुख दर्द का साथी
कट जायेगा अब सफर बाकी ।।
Sanjay R
पावसाच्या सरी
येउन गेल्या दारी ।
सुर्यान आता
लावली हजेरी ।
अशीच राहु दे
उन पावसाची फेरी ।
Sanjay R.
प्रकोप गर्मीचा पाहुन
सुर्यालाही येत असाव
कदाचीत रडायाला ।।
ढगांचा येक समुह
सरसावला पुढे
धरेस शांत करायाला।।
Sanjay R.
लग्नाचा लाडु
गोड का कडु ।
आधी हास्य
नी आयुष्यभर रडु ।
आधी हळद
नंतर जख्मी पडु ।
गुलाबी स्वप्नात
घ्या हाती झाडु ।
Sanjay R.
बघा बघा आला उन्हाळा
सुर्य ओकतोय नुसत्या ज्वाळा ।।
लाही फुटतेय अंगाची
उन्हात होते पळा पळा ।।
धारा लागल्या घामाच्या
कोरडा पडतोय बघा गळा ।।
Sanjay R.
मनमोहक सुगंध फुलांचा
मंजुळ चिवचीवाट पाखरांचा ।।
नाद मधुर टाळ म्रुदंगाचा
दिवस आजचा आनंदाचा ।।
Sanjay R.
वाटत नेत्यांचे
आता फिरले डोके ।
समाजात आता
खुप माजलेत बोके ।
पावलो पावली
आहेत कीती धोके ।
भरतील ते
परत परत खोके ।
Sanjay R.
चढली त्यांना
इलेक्शनची धुंद ।
होश उडालेत
मती झाली मंद ।
Sanjay R.
झाली सकाळ
बघ सोडली खाट
संपला अंधार दाट
पहातोय तुझीच वाट
घेउन बसलोय पाट
बांधायची आहे नाॅट
Sanjay R.
सक्काळ पासुन उचकी येतेय ।
असेल का ही आठवण कुणाची ।।
कोण करील आठवण आमची ।
फुरसत तरी आहे का त्यांना क्षणाची ।।
Sanjay R.
चंद्र आणी चांदणी
घेती पहाटेला निरोप ।
रात्रीच्या जागरणाने
डोळ्यात असते झोप ।
टाळायचा असतो त्यांस
सुर्याचा प्रकोप ।।
Sanjay R.