Wednesday, April 19, 2023

सन्मान

लहान असो वा असो मोठा
करावा प्रत्येकाचा सम्मान ।
तेव्हाच समोरच्या सोबत
आपला ही होतो मान ।
Sanjay R.


मैत्री

जीवनाला हवी मैत्रीची जोड
मैत्रीला नाही कशाची तोड ।
क्षणोक्षणी येते आठवण
नसेल तितकी कशात ओढ ।
आनंद असो वा दुःख असो
मित्र असेल तर नसते लोड ।
समजून घेऊन मिळते साथ
मैत्रीत सारेच होते गोड ।
Sanjay R.


माणुसकीची भिंत

जागो जागी आडवी इथे
माणुसकीची भिंत ।
कुणास नाही घेणे देणे
वाटेल कशी खंत ।

आपुलकीची भावना कुठे
विचार झाले संथ ।
सारेच इथे आहे बदलले
नाही उरलेत संत ।

ज्याचा त्याचा एकच हेका
आहेच कुठे विचार वंत ।
काय आता कुणास ठाऊक
होईल का हो अंत ।
Sanjay R.


प्रेम खोटे

मैत्रीतून होते प्रेम
प्रेमातून मैत्री कुठे ।
नको नको हो आता
खोटी मैत्री प्रेम खोटे ।
Sanjay R.


चुकांचे ओझे

तुझ्या चुकांचे ओझे
कसे मी वाहू ।
आहे तसेच जीवन
बस डोळे भरून पाहू ।
Sanjay R.