Saturday, November 12, 2022

तुझे माझे

तुझ्या माझ्या प्रेमाचा
फुलू दे सुंदर मळा ।
चल जाऊ या दूर कुठे
मलाही लागू दे लळा ।
Sanjay R.


Friday, November 11, 2022

बंध

हवा मला पण तुझ्या
प्रेमाचा बंध ।
जवळ तुला घेऊन
घ्यायचा गंध ।
देशील का तू मज
तो सुगंध ।
सोबत तुझ्या मग
व्हायचे धुंद ।
Sanjay R.


साद

धडधडते छाती
त्यात माझे हृदय ।
नको चुकवू आता
संथ त्याची लय ।


आठवणींनी तुझ्या
गती घेतात श्वास ।
डोळ्यांनाही का
होतात तुझेच भास ।

दूर जरी असेल
येते तुझीच याद ।
कर येकदा तू आठवण
मिळेल मजला साद ।
Sanjay R.



मन झाले पाखरू

मन झाले पाखरू
सांगा कसे मी धरू ।

कधी इथे कधी तिथे
शोधू आता मी कुठे ।

क्षणात घेते दूर भरारी
येते फिरुनी दिशा चारी ।
Sanjay R.


बोल गाण्याचे

शब्दांनी दिली साथ
निघालो गीत गात ।
बोल दुःखाचे होते
सुखाचा नव्हता हात ।
आनंदाचा कुठे प्रकाश
जीवन काळोखी रात ।
भोग मी भोगतो सारे
नशीबाचीच ही बात ।
Sanjay R.