Monday, October 3, 2022

रिटेक

जीवनाचा प्रवास हा
इथे प्रवासी अनेक ।
आज ज्याची होते भेट
भरोसा नाही होईल रिटेक ।

दिवसा मागे दिवस जाता
हळू हळू सुटतो एकेक ।
शेवटाला उरतो कोण
धरतो धुरा तुमचाच लेक ।
Sanjay R.


साथ तुझी

नाही मी एकटा
आहे साथ तुझी ।
असताना सोबत तुझी
करू कशास मी
काळजी माझी ।
Sanjay R.


मन भरले नाही

अजून मन भरले नाही
उरलं अजून करायचं काही ।
इच्छांचा तर सागर मनात
केव्हा होईल ते कळत नाही ।

पूर्ण कधी कुठे होते सारे
प्रयत्नानी आवरायचे पसारे ।
मिळेल त्यात आनंद माना
सुखी जीवनाचे तेच इशारे ।
Sanjay R.


बेभान हे मन

नवरंगाने नटली ही
आभाळाची काया ।
धगधगता सूर्य बघा
सरली त्याची माया ।

वारा गार छेडतो मज
झाले बेभान हे मन ।
पदर थांबेना खांद्यावर
सांग झाकू कसे मी तन ।

कसे सांभाळू मी मज
नजरेत भरला ज्वर ।
दूर सळसळली वीज
आली धावून सर ।
Sanjay R.


मातेचे गुणगाण

नवरात्री चे आयोजन
माँ दुर्गाचे करू नमन ।
अंबा जगदंबा तू काली
माते कीर्ती तुझी महान ।
दुराचाऱ्यांचा करी विनाश
अष्टभुजा ग तुझीच शान ।
मनोकामना होई पूर्ण
करील जोही तुझे ध्यान ।
जय आंबे जय जगदंबे
भक्तिभावे करतो गुणगान ।
Sanjay R.