Tuesday, August 2, 2022

सांजवेळ

सांजवेळ ही झाली
सूर्य निघाला अस्ताला ।
पसरली लाली चहूकडे
चढली धुंदी वाऱ्याला ।
चाहूल होता अंधाराची
पक्षी निघाले घरट्याला ।
तान्हुलेही वाट पाहती
देई साद अपुल्या मातेला ।
Sanjay R.

Monday, August 1, 2022

नकळत म्हातारपण आलं

दिवसामागून दिवस गेले
नकळत हे सारे झाले ।
बालपणातून तारुण्य आले
तरुण्याचे हो दिवस गेले ।
हाता पायात दुखणे आले
कळले आता वय झाले ।
शब्द आता छोटे झाले
चष्म्यातूनच बघणे आले ।
केसांनीही सोडला रंग
काळ्याचे ते पांढरे झाले ।
श्वास पुरेना चालायला ही
धडधड हृदय करू लागले ।
नकळत हो दात गेले
कळले आता काय झाले ।
वय झाले हो वय झाले
नकळत म्हातारपण आले ।
Sanjay R.

इशारा

रंग प्रेमाचा आहेच न्यारा
तुफानी असतो तो वारा ।
येते मग वादळ जेव्हा
नको वाटे कुठला सहारा ।
वाटत चिंब त्यात भिजावं
पडू दे पावसाच्या धारा ।
आभाळाच्या आड चमचमते
जेव्हा हळूच एक सितारा ।
मन निघते आनंदून
तोच असतो प्रेमाचा इशारा ।
Sanjay R.


जीवाची तगमग

थांबला आता पाऊस
शेतात कामाची लगबग ।
पिकांचा झाला नासोडा
सांगा पिकेल काय मग ।
मेहनत पैसा गेला वाया
जीवाची होते तगमग ।
अमदा पोट भरायचे कसे
छातीत होते हो धगधग ।
Sanjay R.

रंगांची दुनिया

अजब ही दुनिया
यात रंग किती ।
आचार विचार वेगळे
कुठे द्वेष कुठे प्रीती ।

रंग जिथे काळा
थोडी वाटते भीती ।
अवकाशात बघतो
अंतापूर्वीच इति ।

रंगात रंग मिळता
आगळी वेगळी स्थिती
प्रारब्धाचा खेळ सारा
अजब निसर्गाची नीती ।
Sanjay R.