Saturday, July 2, 2022

आघात

तुझ्या कवितेतली साद
करून गेली आघात ।

शोधतो अर्थ मी शब्दांचा
वाटत जीवन झाले अनाथ ।

जरा दोन पाऊले तू ये पुढे
असेल तूला या मनाची साथ ।

चुकलेली वाट ती मागे गेली
सुटणार नाही धरलेला हात ।
Sanjay R.


ढगांनी वेढलं आकाश

ढगांनी वेढलं आकाश
दर्शन सूर्याचे होईना ।
पडेल केव्हा पाऊस
काय तेच कळेना ।

कधी तरी येतात मधेच 
चार दोन सरी बरसतात ।
भिजत नाही धरा त्यात
रंग पावसाचे ओसरतात ।

शेत अजूनही तहानलेले
पदर धरेचा भिजेना ।
डोळे लागले आकाशात
बी मातीतले रुजेना ।
Sanjay R.

होऊ नको तू माणूस

होऊ नको तू माणूस
भाव मनात तू आणुस ।
मन तुला का कळेना
तेही नको तू जाणूस ।
नाही विचार रे तुझ्यात
नको डोक्याला तू ताणुस ।
होऊ नको तु माणूस
भाव मनात तू आणुस ।
Sanjay R.

तोडफोड

प्रश्नाचे हवे उत्तर
करणार किती तडजोड ।
किती तुझे प्रश्न
करू कशी मी फोड ।
जीवनाचा हा प्रवास
सगळ्यांचीच लागली होड ।
साखरेहून सांग
आहे का दुसरे काही गोड ।
टेन्शन सोड आता
घेऊ नकोस तू लोड ।
हसत राहा नेहमी
नाहीतर होशील अशीच रोड ।
चला जाऊ आता
करू या थोडी तोडफोड ।
Sanjay R.


तडजोड

मार्ग जीवनाचा कठीण
खाचखळगे इथे किती ।
प्रत्येक पाऊल ठेवा जपून
हवी स्व रक्षणाची नीती ।
मांडले काय समोर कुठे
त्यातच मग थांबते गती ।
विचारांचे वादळ छळते
सहजच मग तुटते मती ।
जायचे आहे पुढेच पुढे
सांभाळून सगळी नाती गोती।
माघारीचा मग मार्ग नसता
तडजोडीशिवाय काय हाती ।
Sanjay R.