Saturday, June 4, 2022

जीव जडला तुझ्यात

करून तू चोरी
फिरतोस बनून राव ।
सांग रे लबाडा
कुठवर तुझी धाव ।
सारखा करतोस फेऱ्या
नाही सम्पत का हाव ।
माझ्याशिवाय सांग
तुज देईल कोण रे भाव ।
किती फिरलास मागे
लागला नाही ना ठाव ।
हृदय माझे चोरून तू
होऊ नकोस आता साव ।
मलाही झाली सवय 
बघ दिसेल तुलाही प्रभाव ।
हवी जन्माची साथ
नाही देणार ना रे तू घाव ।
जीव जडला तुझ्यात
जीव जीवाला तू लाव ।
Sanjay R.

चोर

सांग हृदयावर चालतो

का असा कुणाचा जोर ।

नकळतच होते चोरी

फुलतो मग मनात मोर ।

कालचाच तर मी होतो

साधा सरळ एक पोर ।

स्वप्न मनात होते एक

हवी वाटे चंद्राची कोर ।

हृदय माझे चोरलेस तू

पण झालो मीच थोर ।

शोधू कुठे मी आता

माझ्या हृदयाचा चोर ।

Sanjay R.



Friday, June 3, 2022

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती
प्रत्येकाचे वेगळे तत्व ।
शोधू कुठे सांगा कसे
त्यातून हवे तेच सत्व ।

आतून एक बाहेर दुसरा
शोधणे कठीण गुण खरा ।
अंतराचा लागेना ठाव
कळते ती वेगळीच तऱ्हा ।

दिसण्यावर नका जाऊ
दिसते तसे ते नसते ।
फसवणूक झाली तर
जग आपल्यालाच हसते ।
Sanjay R.


Thursday, June 2, 2022

जीवनाचे काय झाले

काय काय घडून गेले
सारेच तर उडून गेले ।
जुना भूतकाळ झाला
सजमजून आता आले
वर्तमानात जगता जगता
विचार भविष्याचे आले ।
काय करू काय नको
दिवासा मागे दिवस गेले ।
अजूनही मी तिथेच उभा
बघा जीवनाचे काय झाले ।
Sanjay R.


Wednesday, June 1, 2022

अपूर्ण स्वप्न

स्वप्नांची तर एकच व्यथा
अपूर्णच असते ती कथा ।

जेव्हा जेव्हा मी बघतो स्वप्न
घडते उलटे नशीबाचाच ताता

मनात होते स्वप्नांचीच गाथा
सरते आयुष्य पाहता पाहता ।

अंत समयी मग कळते सारे
होतो माझा मीच विधाता ।
Sanjay R.