Monday, February 28, 2022

मी माझे नाव

चरित्र नसलेला मी
देऊ कशाचे नाव ।
माणुसकी नसलेला
आहे माझा गाव ।

प्रेम आपुलकी माया
शब्दच कुठे ठाव ।
स्वार्थ मोह मत्सर
सोबती माझे राव ।

पैश्यासाठीच जगतो
तीच मला हाव ।
पळत असतो सारखा
थांबत नाही धाव ।

पैसा पैसा करतो
देवा मला पाव ।
पैश्यानेच मिळेल ना
मला माझे नाव ।
Sanjay R.




दोन शब्द

दोनच तुझ्या शब्दात
सारेच मज कळले ।
हवे कशास ते पत्र
शब्दांनीच सारे जुळले ।
Sanjay R.


सहजच तुटतात धागे

मनाचे काय मी सांगू
सहजच तुटतात धागे ।
शिवायचं म्हटलं तर
विचार ओढतात मागे ।
आठवणींचा सार तिथे
क्षणात होतात जागे ।
होऊन अश्रू ओघळती
शब्द हृदयास लागे ।
Sanjay R.

Saturday, February 26, 2022

ती एक रहस्य

रोजच असते ना सोबत
चाललो मी जरी किती ।

काळोखात थोडी विसावते
उजेडाची नाही भीती ।

कधी होते लांबच लांब
होते कधी खूपच छोटी ।

रहस्य मज उलगडे ना
मजवर का ती करते प्रीती ।

सावली ती माझीच अशी
सदा असतो हात हाती ।
Sanjay R.

Friday, February 25, 2022

इंद्रधनुष्य

सारखे बदलतात रंग
वाटे जणू इंद्र धनुष्य ।
सुख दुःखाच्या वाटेवर
नाही एकटा मी मनुष्य ।
यात्रा चाले ही अविरत
बघतो अनेकानेक दृश्य ।
डोळ्यात जरी आसवे
ठेवितो मुखावर हास्य ।
Sanjay R.