Friday, February 4, 2022

कथा संग्रह चंद्रा

माझा पहिला कथा संग्रह प्रकाशित झालाय, नक्की वाचा ....

https://shopizen.app.link/8X8rtWRJmnb

Thursday, February 3, 2022

कथा सासू सुनेची

कथा आहे ही सासू आणि सुनेची . 

सुन होते सासू किती ती गुणाची. 

नवी नवखी सून येते जेव्हा घरात . भीत भीत टाकते पाऊल  भीती तिला कुणाची . 

सगळेच असते नवीन , कल्पना कुणाच्या स्वभावाची. 

नवरा वागेल कसा चिंता त्याच्या मनाची. 

सासू, सासरे, दिर, ननंद मर्जी सांभाळायची साऱ्यांची. सासू असते तापट, बोलायला थोडी तिखट, ननंद तर नेहमीच तुरट. 

सासरा असतो थोडाच गोड, दिर म्हणजे माथे फोड ,घरच किती खारट.



नवऱ्याच्या स्वभावाचा लागेना अंदाज, बोलतो किती गोड, 

दाखवी कधी भीती, कधी घालतो मोड. 

म्हणतो मग मधेच, जिथली गोष्ट तिथेच तू सोड.

 स्वतःकडे बघ जरा, झालीस किती रोड. 

कधी म्हणतो सिनेमाला जाऊ, तिकडेच जाऊन आईस्क्रीम खाऊ. जेवण करूनच मग घरी परत येऊ.



गोष्ट कळते सासूला.  तिचा चढतो पारा. 

धुसफूस धुसफूस होते सुरू, ननंद घालते मग हळूच वारा. 

दिर म्हणतो चिंता मिटली . सोबत येतो मी पण, चला लवकर लवकर आवरा. 

नणंद दिर सासू सासरे सारेच जातात सीनेमाला.

 आईस्क्रीम कुठे जेवण कुठे. लागते तीच मग परत येऊन कामाला.

नसते कोणी मदतीला, धावपळ होते जीवाला.



तिखट भाजी, खारट वरण पोळी लागते करपायला. 

सारे घेतात पोट भरून, तिलाच नाही उरत काही, घेते उरले सुरले जेवायला.



रोज असतो तसाच दिवस, त्यातच येतो दिवस आनंदाचा, 

उधाण येते उत्साहाला, सारेच करतात लाड प्रेम, नसते सीमा कशाला. 

नव्या पाहुण्याची लागते चाहूल, लागतात सारेच कामाला. 

हळू हळू दिवस सरतात, घेऊन येतात पाहुण्याला. लळा लागतो पाहुण्याचा, लाडात वाढतो पाहुणा, कुणाकडेच नसतो वेळ मागे वाळुन बघायला.

 छोट्याचा तो होतो मोठा, बहर येतो जीवनाला.
परत येते नवीन सून, सासू मिळते सुनेला.

 जीवनाचा तर हाच परिपाठ , 

रात्री नंतर परत दिवस, अस्त कुठे त्या सूर्याला.

संजय रोंघे



कुटुंब

कुटुंब मनलं का बा
मले लय येते इचार ।
डोयापुढं दिसते मंग
कर्ता घरातला लाचार ।

राब राब थो राबते
सकाय असो का दुपार ।
आभाया कडं पायते
डोकश्यात ढगायचा संचार ।

पानी पानी होते जीव
निस्ता पन्याचाच इचार ।
डोयात बी दिसते पानी
जवा होते थो लाचार ।

कष्टाचं कुठं होते चीज
जीवनच त्याच बेजार ।
कधी सुदाच होत नाही
त्याचा दरिद्री आजार ।

जवा पाहान तवा त्याच्या
भोवताल कर्जाचा बाजार ।
कोन त्याले जगू देते
गळा पकडते सावकार ।

नशिबाचे भोग सारे
कुटुंब ही होते लाचार ।
जगाचा म्हनते पोशिंदा
पन कोनालेच नाही इचार ।

संजय रोंघे
नागपूर
मोबाईल - 8380074730


Friday, January 28, 2022

नाते

नाते फक्त नसते ओळख
त्याहून असतो बरा काळोख ।

व्यवहार जसा असावा चोख
नात्यात तसेच नसावे टोक ।

राखून बोलणारे असतात फेक
नात्यात नेहमीच असावे नेक ।

मन किती अस्थिर घेते ते झोका 
नात्यात कशास देता हो धोका ।

जुजबी ओळख उलथून फेका 
नात्यात घ्यावा अंतरातून ठेका ।
Sanjay R.

Thursday, January 27, 2022

लुकलुकता एक तारा

बघतो आकाशात
लुकलुकता एक तारा ।
गालातच हसतो
वाटते करतो इशारा ।

हळूच अंगाशी
खेळे सळाळता वारा ।
झुलतो पदर कसा
छेडतो मनाच्या तारा ।

होई आभास जणू
झुळझुळ वाहे झरा ।
सरसर येतात सरी
चिंब भिजते धरा ।
Sanjay R.