Sunday, September 5, 2021

" भूत संशयाचे मनी "

भूत संशयाचे मनी
जसा मागे लागे शनी ।
बंध नात्याचे तुटती
झरते डोळ्यात पानी ।
नको विचार कसले
हवी मधाळ वाणी ।
हवे सुखाचे तरंग 
गाऊ आनंदाची गाणी ।
हसत सदा असावे
ही जीवनाची कहाणी ।
Sanjay R.

Saturday, September 4, 2021

" अंतरात कुठला भाव "

अंतरात कुठला भाव
करी मनावर घाव ।
कुणा म्हणू मी आपला
आहेत सारेच साव ।
नाही जाण कशाची
नाही कुणास ठाव ।
ओळख कुठे कुणाची
नाही कुणास नाव ।
सर्व सोडिले तुझ्यावर
देवा तूच मजला पाव ।
Sanjay R.


Friday, September 3, 2021

" विसरू कसे मी सांग "

विसरू कसे मी सांग
कसे फेडील मी पांग ।
उपकार तुझे मजवर
मोजू किती मी सांग ।
पडेल जन्म हा अपुरा
नाही ही भरणार रांग ।
सोडू कसे मी तुजला
प्रेम तुझेची अथांग ।
आईविना लेक पोरका
विसरेल कसा मी सांग ।
Sanjay R.


Thursday, September 2, 2021

" गूढ अंतराचे "

गूढ अंतराचे कळेना
अडकले मन वळेना ।
मनात विचार किती
कधी कशाशी जुळेना ।
क्षणात बदलते कसे
कधी कुणास छळेना ।
करतो मी सहन सारे
भोग नशिबाचे टळेना ।
Sanjay R.





Wednesday, September 1, 2021

" सांगा काय करायचं "

झालं ते आता विसरायचं
रुसणं फुगण सोडायचं ।

गालात थोडं हसायचं
पुन्हा नाही रुसायचं ।

मागे कशाला वळायचं

पुढचंच सारं बघायचं ।

मार्ग हा कुठे सरतो
अजून बरंच चालायचं

करणार काय आता
नाही मनात ठेवायचं ।

घेऊ वाटून सुख दुःख
हसत हसत जगायचं ।

जेव्हा येईल वेळ तेव्हा
बघू ना काय करायचं ।

टाळलं कुणाला मरण
त्यालाही आहे थकवायचं ।
Sanjay R.