Wednesday, March 31, 2021

" लागली चाहूल "

पहाटेचा गार  गार वारा
लुप्त होतो आकाशी तारा ।
सूर्य बघतो डोकावून जरा 
प्रकाशित होतो आसमंत सारा ।
किलबिल पक्षांची त्यांचाच तोरा
लागली चाहूल नाच रे मोरा ।
Sanjay R.

Tuesday, March 30, 2021

" पूरे तुझे बहाणे "

अचानक तुझे येणे
आणि निघून जाणे ।
त्यातही होते तुझेच
न कळणारे तराणे ।
वाटायचं कधी मग
हे तर रोजचेच गाणे ।
नकोच वाटे आता
कर पुरे तुझे बहाणे ।
स्वछंद जगायचे आता
बंदिस्त नको जगणे ।
नाही भीती कशाची
शेवटी तर आहेच मरणे ।
Sanjay R.



" एवढेच काय ते मागणे "

नाही कशाचे मागणे
सारेच मज लाभले ।
देवा तुझ्याच कृपेने
जीवन माझे हे फुलले ।

काय मागू मी तुजपाशी
दे मन जसे आभाळ खुले ।
परपकारी होऊ दे मज
जशी देवावरची फुले  ।

हवा भाव मज निरागस
कुविचारांचे नको झुले ।
लोभ  मत्सर विनाशक
प्रेमानेच तन मन डोले  ।
Sanjay R.

Monday, March 29, 2021

" रंगाचा हा सोहळा "

रंग लाल लाल 
हिरवा पिवळा ।
खेळे राधा संगे 
कृष्ण सावळा ।

विसरून दुःख सारे
होतो ढवळा पिवळा ।
ओळखेल कशी ती
तिचाच तो मावळा ।

खेळ चाले रंगांचा
होऊनिया बावळा ।
उत्साही आनंदी
रंगाचा हा सोहळा ।
Sanjay R.

Sunday, March 28, 2021

" अंतरात अनामिक ओढ "

कहाणी ही तुझी माझी
नाही तिला कुठली जोड ।

तरी वाटे मनास माझ्या
अंतरात अनामिक ओढ ।

घालवू कश्या त्या आठवणी
छेडती मज ती त्यांची खोड ।
हुंदके आणि नेत्र लढती
लागते मग त्यांचीच होड ।

जा विसरून सारे आता
भूतकाळ सारा आता तू सोड ।
दे सोडून बंधन सोडून सारे
आयुष्याला करू या गोड ।
Sanjay R.