Tuesday, January 12, 2021

" मोगऱ्याची कळी "

बघून तुझ्या गालावर
गोड गुलाबी खळी ।

मनात माझ्या खुलली
जशी मोगऱ्याची कळी ।

सहजच मी गुणगुणलो
चार प्रेमगीताच्या ओळी ।

शब्दांना कुठले नव्हते बंध
तरी का ओठांना ते छळी ।
Sanjay R.


" लायब्ररी "

आवड होती वाचनाची
जायचो मी लायब्ररीत ।
वाचनापेक्षा मजा यायची
निरीक्षण तिथे करण्यात ।
निमित्तच असायचे वाचन
दिसायचं त्यांच्या वागण्यात ।
भाव डोळ्यातले त्यांचे
वेळ जायचा बघण्यात
वाटायचं मग मला  जणू
लायब्ररीच आहे कादंबरी ।
तरुण्यातल्या त्या प्रेमाची
लघुकथाही तीच खरी ।
Sanjay R.


Monday, January 11, 2021

" नको मनात अहंकार "

नको मनात अहंकार
वाईटच हा संस्कार
साधा सरळ आचार
नको वाईट विचार
हा आयुष्याचा आधार
करावे थोडे उपकार
वाटेल हलका भार
असता हाच सार
जीवनात तारे चार
Sanjay R.



Saturday, January 9, 2021

" लेक पडावी सुखात "

विचार एकच लेक पडावी सुखात

राहील ना मी थोडासा दुःखात ।

समाजाची चिंता असे डोक्यात
असो वा नसो पैसा खिशात ।

करायचे लग्न ब्यांडच्या ठोक्यात
वस्ताद सासरचे दुषणं देण्यात ।

कमी नको पडायला काही कशात
उधळतो पैसा नी डुबतो कर्जात ।

इज्जत प्यारी दिसते डोळ्यात
असह्य झाले तर फास गळ्यात ।
Sanjay R.


" आमच्या गावचा शिरपा "

ओयखता का हो तुम्ही
आमच्या गावचा शिरपा ।
काय म्हनावं बा त्याले
एका डोळ्यानं तिरपा ।

करून मोल मजुरी 
थो कसा तरी जगते ।
पोरी त्याले सात पर
वाट पोराचीच पायते ।

लेकरायची न्हाई सोय
पोरगच पायजेन म्हनते ।
बायकोबी तशीच त्याची
तिले बी काय कयते ।

लेकरायचे हाल पाहून
मन साऱ्यायचं जयते ।
पर शिरपा न्हाई मानत
थो पोरकडच पयते ।
Sanjay R.