Sunday, April 5, 2020

" सारेच व्यर्थ "

असेल जिथे स्वार्थ
नाही कशालाच अर्थ  ।

जीवनात हवा परमार्थ
अन्यथा सारेच व्यर्थ ।

मोह माया आणि क्रोध 
लक्षणे ही सारी धूर्त ।

बाळगा थोडा सय्यम
जीवन हेच प्रसाद तीर्थ ।
Sanjay R.

Saturday, April 4, 2020

" क्षण हातातून निसटत आहेत "

जीवन हे संकटांचा सागर
अहोरात्र चाले कष्टाचा जागर ।

घ्यायचा साऱ्यांनाच इथे आनंद
पण हाती आहे  फुटकी घागर ।

अशांत हे बघा जीवन किती
शोधतो शांती नगर नगर ।

जग हे इथले विशाल किती
चहूकडे दुःखाचा पसरला सागर ।

घेतो भरून ओंजळीत आता
सुख अंतरात लागे त्यावर नजर ।

क्षण हातातून निसटत आहेत
जीवना थांब थोडा मी आहे हजर ।
Sanjay R.

Friday, April 3, 2020

" अनमोल वेळ "

जीवन हा नाही खेळ
अनमोल असे यात वेळ 
काढून सवड बसवा मेळ 
लाभतो मग आनंद निर्भेळ 
Sanjay R.

Thursday, April 2, 2020

" कोण काय कोणासाठी "

फरक हा विचारांचा
कोण काय कोणासाठी ।

सेवेचे व्रत आहे ज्यांचे
जगतात ते दुसऱ्यांसाठी ।

नाही चिंता स्वतःचीही
जगणे मरणे परिपकारासाठी ।

धडपड कुणाची कुणासाठी
कर्तव्यच श्रेष्ठ त्यांचे साठी ।

जीवनाची करतो चिंता
काळजी त्याची पोटासाठी ।

हात शोधतात काम कुणाचे
बसला घरात जगण्यासाठी ।

आहे असाही इथे कोणी
जीवनच शून्य त्यांच्यासाठी ।
Sanjay R.




Wednesday, April 1, 2020

" विचार "

विचारांना कुठे आहे औषध
विध्वंस जर असेल डोक्यात ।
डुबतात घेऊन जग ते  सारे
ओळखा जरा राहू नका धोक्यात ।
Sanjay R.