Friday, January 3, 2020

" अकाली पाऊस "

पावसाने अजून हो
सोडला नाही पिच्छा ।
घे म्हणा पूर्ण करून
उरल्या सुरल्या इच्छा ।

यंदा तर पावसाने
पीक गेले वाया ।
सांगा आता तुम्ही
पडू कुणाच्या पाया ।

नशीबच हे असं
काय आता करावं ।
शेती माती सोडून का
दुसरं काम धराव ।
Sanjay R.

" स्वीकार शुभेच्छांचा "

नको रंग नको गंध
तुझ्या या पुष्पगुच्छला ।
स्वीकारतो अंतरातून
तुझ्या या शुभेच्छेला ।
Sanjay R.

Thursday, January 2, 2020

" रे बळीराजा कवितेचे प्रकाशन "

माझे व्यासपीठ मासिक मुंबई जानेवारी 2020 अंकात माझ्या " रे बळीराजा " या कवितेचा समावेश करण्यात आला. संपादकांचे खूप खूप आभार .

" वर्ष वीस वीस"

जुने गेले आणी नवे आले
वर्षा मागून किती वर्ष झाले ।
नववर्षाची तर रात्रच न्यारी
नाचून काढली करून तयारी ।
लहान थोरांना पण खुशी मोठी
सारेच जमले नाचाय साठी ।
बारा वाजता ओरडले हॅपी ।
कुणी कुणाचा घेतला पपी ।
झिंगले किती पडले किती
ती पण दिसली वेगळीच रीती ।
जुन्या वर्षाच्या आठवणी मनात
भरायचा उत्साह नवीन वर्षात ।
राहिलं सुटलं सारं करायचं
आनंदात अगदी मस्त जगायचं ।
Sanjay R.

" आली थंडी "

पहिला यंदा पावसाचा हिसका
आली थंडी थोडे सरका ।

पेटवा ना शेकोटी अहो काका
प्रसंग आहे मोठाच बाका ।

नका विचारू चहा घेता का
थर थर कापतोय वाटतो धोका ।
Sanjay R.