Thursday, October 31, 2019

" संपली दिवाळी "

आली आणि गेली
आनंदाची दिवाळी
आता पैसा संपला
वाजवा फक्त टाळी
चव अजून जिभेवर
नको पुरण पोळी
सुट्ट्या पण संपल्या
लागा कामाला सकाळी
Sanjay R.

Tuesday, October 29, 2019

" आपला दिवाळी अंक 2019 "

' नागपूरची संत्री फेसबुक समूह '
द्वारा संपादित
"आपला दिवाळी अंक 2019 "
चे प्रकाशन -

नमस्कार मित्रांनो,

दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर आपणा सर्वांसाठी आज एक आनंदाची वार्ता आहे.

आपणा सगळ्यांच्या अथक प्रयासा नंतर आपल्या नागपूरची संत्री समूहाचा ई - संग्रह " आपला दिवाळी अंक 2019" प्रकाशित करीत आहोत, आपणा सगळ्यांना हा वाचता यावा या साठी खालील लिंक वर उपलब्ध करून देत आहोत.

अंकात सामील सर्व साहित्यिक, लेखक, कवी, कथाकार, विचारक आणि रेसिपी लिहिणाऱ्या गृहिणींचे नागपूरची संत्री समूहातर्फे मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि आपला हा ई दिवाळी अंक वाचकांसाठीआज दिनांक 28.10.2019 रोजी प्रकाशित करतो. हा अंक नक्कीच आपणा सगळ्यांना आवडेल अशी आशा आहे.
धन्यवाद...

लिंक :-
https://drive.google.com/file/d/15stmUxEFFFQp0OZeGMEVynYyiIiwXsgQ/view?usp=drivesdk

अंक आवडल्यास आपल्या समुहाच्या https://www.facebook.com/groups/nagpurchi.santri/ लिंक वर जाऊन नक्की कमेंटस् द्या.

पुस्तक स्वरूपात पाहण्यासाठी खाली ‍क्लिक करा

https://www.flipsnack.com/nsaapladiwaliank2019/-.html

पूर्ण अंक डाऊनलोड करण्यासाठी खालील लींक वर जा

https://drive.google.com/file/d/15stmUxEFFFQp0OZeGMEVynYyiIiwXsgQ/view?fbclid=IwAR2Kw58sCQ9k7mc1jMutlIZ0hY1O0EUYnzy4KpQXdw8spkA9k0zetzHLxkA

Monday, October 28, 2019

" दिवाळी तुझी रे बळी "

राहू दे तेवत असाच
दिवा या दिवाळीचा ।
करु नकोस अंधार
प्रकाशित जीवनाचा ।

गेली पावसात दिवाळी
हिरमुसला किती बळी ।
घरात शिरले लोट पाण्याचे
दुःख किती त्याच्या कपाळी ।

लुप्त झालेत आसवं सारी
गंगा यमुनेस आला पूर ।
मदतीला हाक देऊ कुणास
वाट सुखाची किती दूर ।
Sanjay R.

" करू स्वागत दिवाळीचे "

तेज प्रकाशाचे
छोट्याश्या पणतीचे ।
येई घेऊन सौख्य
वेचू क्षण आनंदाचे ।
सरु दे अंधार सारा
भाग्य उजळू दे जीवनाचे ।
हर्षोल्हासात करू स्वागत
सारे आपण दिवाळीचे ।
Sanjay R.

Saturday, October 26, 2019

" देवाला पत्र "

चला लिहू या देवाला पत्र
सांग म्हणावं आता
कधी थांबेल पावसाचे सत्र ।

धुवून पुसून झाले ना स्वच्छ
पुराच्या पाण्यापुढे
अश्रूही झालेत किती तुच्छ ।

घर गेले संसार तुटला
नाही छत डोक्यावर
देवा कारे असा तू रुठला ।

काय सांगू मी अजून तुला
देवा करतो तुझाच धावा
कर ना मदत तूच आता मला ।
Sanjay R.