Wednesday, July 31, 2019

" वाहतुकीचे नवीन नियम "

रस्त्यावर होणारे अपघात कमी करण्याच्या दृष्टीने सरकारद्वारे वाहतुकीचे कठोर नियम अमलात येणार, हे ऐकून खूप छान वाटले. सरकारने घेतलेले हे पाऊल खरच आवश्यक व प्रशंसनीय आहे.
आता सरकारने ज्या रस्त्यावरून ही वाहने धावतात त्या रस्त्या संबंधातिल देखरेख आणि त्यांची व्यवस्था याला निगडित नियम ही स्थापित करून, रस्त्यातील गड्डे झाड, खांब, गतिरोधक व इतर अनेक कारणांच्या गैर वयवस्थे मूळे होणाऱ्या अपघाता मुळे होणाऱ्या अपघाता समबंधात सरकार वर काय कारवाई आणि दंड कसा राहील, या संबंधात नियमावली प्रकाशित करावीसरकारचे खरच खूप खूप अभिनंदन 
Sanjay Ronghe

" मिळाल्या मज वाढदिवसाच्या शुभेच्छा "

दिवस आजचा बघा
किती किती आनंदाचा ।
नभातून बरसणाऱ्या
संततधार पावसाचा ।
गीत मधुर पावसाचे
उत्साहाने गाण्याचा ।
वाढदिवस आजच
साजरा करण्याचा ।
रिमझिम रिमझिम
किती बरसतोय पाऊस ।
वाढदिवसाची ही
मी पूर्ण करतोय हौस ।
शुभेच्छांचा झाला वर्षाव
मित्र माझे खासम खास ।
ऋणी मी या सर्वांचा,
मलाही त्यांचाच ध्यास ।
Sanjay R.

" तन वाहाडल वावरात "

पाऊस पडून रायला
करतं का वो भजे ।
झकास करतं व तू
कापतो कांदे मायमाजे ।
झडच लावली पावसानं
होईन का आता सरदी ।
डॉकतर खुश किती पाय
दवाखान्या मंदी लैच गरदी ।
तन वाहाडल वावरात
मजूर न्हाई भेटत कोनी ।
आपल्यालेच करा लागन
संग घेजो पोरं दोनी ।
जाऊ दे न आता शाईच
चार दिस जाईन त्यायचे ।
चार पोते पिकन जास्ती त
पैसे देऊ मंग टीवशन चे ।
जास्ती इचार तू करू नको
हात जरासा आवर लवकर ।
देवानं देल जास्ती काई त
पोटात जाईन भाकर चोतकर ।
Sanjay R.

Monday, July 29, 2019

" म मराठीचा "

बघा म मराठी चा
शब्द किती सुंदर हा ।
लिहितो बोलतो वाचतो
शब्द संग्रह मायबोलीचा हा ।
आई जनक या बोलीची
वर्णावी काय महिमा तिची
बाप भाऊ बहीण सारे
रुजवती नाती जन्माची ।
मित्र मैत्रिण शब्द जीवाचे
ऋणानुबंध आयुष्याचे ।
सुंदर निर्मळ आनंद
सोबती सारे या जन्माचे ।
मराठीची गाथा अफाट
भावार्थ शब्दांचा विशाल ।
ग चा गा होतो जेव्हा
होते थोडी मग धमाल ।
मी मराठी अभिमान माझा
ज्ञानियांचा ज्ञानेश्वर ।
सामावला संसार इथेच सारा
म्हणता ई चा ईश्वर ।
शब्दांची नाही उणीव काही
बरळतो कुणी काही काही ।
मराठीचे तर वैभव मोठे
डंका तिचा दिशा दाही ।
Sanjay R.

" रिमझिम रिमझिम बरस रे आता "

व्यापल आभाळ ढगांनी
सुरुवात केली पावसानी ।
रिमझिम रिमझिम बरसतो आता
पाणी वाहतेय नाल्यांनी ।
हिरवी हिरवी झाडं हसली
हलताहेत कशी झोक्यांनी ।
आलास आता बरे झाले
अडवलं तुला कुणी धोक्यानी ।
पड आता तू रे खूप पड
भरू दे नदी तुझ्या पाण्यानी ।
आली होती आसवं डोळ्यात किती
तुझ्या या हट्टी वागण्यांनी ।
पड रे आता हवा तितकाच
आनंद फुलू दे तुझ्या येण्यानी ।
Sanjay R.