Friday, June 28, 2019

" छळतेस तू किती "

तू फुलातला सुगंध
दरवळतेस मंद मंद ।
होतो किती मी वेडा
आणी मन माझे बेधुंद ।
पाकळी तू फुलाची
कोमळ किती मनाची ।
वेडावते मला कशी
नजरा नजर क्षणाची ।
झुलते कशी वाऱ्यासह
थांबून मधेच खुणावते ।
बघतो मागे मी परतून
आठवणीत मन गुंतते ।
नवरंगी परिधान तुझा
भासे मज तू स्वप्नपरी ।
छळतेस मज किती तू
नजर भिरभिरते तुझ्यावरी ।
Sanjay R.

" होते सारेच धूसर "

वाट तुझी मी पहातो
रोजच तुझ्या वाटेवर ।
काटा घडयाळीचा थांबतो
मोजतो तू किती अंतरावर ।
वेळ होताच तुझ्या येण्याची
मनात होतो मग एक गजर ।
वाढते गती माझ्या श्वासांची
शोधते नजर तुज दूरवर ।
प्राण येतात मग कंठाशी
आणि होते सारेच धूसर ।
Sanjay R

.

Thursday, June 27, 2019

" बरसात "

झाली पावसाला सुरुवात
पण जास्त सुर्याचीच बरसात ।
लोट घामाचे कसे वाहतात
अस्वस्थ होतो दमट वातावरणात ।
भिजव रे तूच आता पावसा
करू नकोस असा तू आघात ।
वाट बघते छत्री अजूनही
होईल कधी पावसाळी प्रभात ।
Sanjay R.

" वृक्ष तोडीचे बंड "

झाला थोडा पाऊस
हवा झाली थंड ।
ढगा आडून सूर्य म्हणतो
आहे मी अजून इथेच
भरावा लागेल दंड ।
पाऊस यायला बघा
ढग हवेत अखंड ।
वारा आहेच कुठे
पुकारलं ना तुम्हीच
वृक्ष तोडीच बंड ।
झेला आता परिणाम
नुकसान तुमचेच प्रचंड ।
Sanjay R.

Tuesday, June 25, 2019

" आयुष्य झाले रे पोळपाट "

नेहमीचेच झाले आता
लागते पेरणीची विल्हेवाट ।
झलक थोडी दाखवतो
पाहायला लावतो वाट ।
काय सांगावा कसा हा
मोसमी वाऱ्यांचा थाट ।
निळे निळे आभाळ सारे
ढग काळे लावतात काट ।
खिसा होतो रिकामा सारा
जीवनालाच लागलंय नाट ।
सांग बळी झेलतो कसा
आयुष्य तुझे रे पोळपाट ।
आशेवरच जगतोस तू
कधी उगवेल सुंदर पहाट ।
Sanjay R.