Tuesday, December 11, 2018

" संसराले आग "

संसाराले आग लावली
ढीग भर या कर्जानं ।
पेउन आता मस्त होतो
जमवलं या दारूनं ।
कायचीच न्हाई फिकीर
भार उचलला बायकोनं ।
पाच पन्नास अशेंच जमते
बायकोबी देते धवसीनं ।
बरं लयच मले वाटते
जमलं सार हिमतीनं ।
बिन बापाचे लेकरं मंग
कशे जगले असते मैतीनं ।
Sanjay R.



" मातीमोल जीनं "

घर पहा तुटकं आन
घालाले फाटक ।

सांगा ना राव तुम्ही
कसं होईन नेटकं ।

जीनं शेतकऱ्याचं पहा
दिसते कसा भटका ।

कर्जा पायी बसते
आंग भर चटका ।

घेऊन मंग फंदा
करून घेते सुटका ।

कोनाले काय त्याचं
येळ न्हाई घटका ।

उजाड होते घर आनं
लेकरं भोगते झटका ।

माती मोल जीन त्याच
दाबते कोनिबि खटका ।
Sanjay R.



Monday, December 10, 2018

" सूर्याचे आज दर्शन नाही "

आभाळ व्यापलं ढगांनी शाही
सूर्याचे आकाशात दर्शन नाही

दाटला काळोख, प्रकाशाची त्राही
थंड गार वारा , वाहे घाई घाई

वातावरणात आहे ओलावा काही
मन मात्र कोरडे, दिशा दाही

आस डोळ्यांना, वाट ते पाही
फुलाला मोगरा, गंधच नाही
Sanjay R.



Saturday, December 8, 2018

" दिवस सरत नाही "

नाही दिसली ना तू
की करमतच नाही ।
तुझ्या विना सांगू काय
दिवस ही सरत नाही ।
का कुणास ठाऊक
कसं कळेल तुला ।
तुझ्या विना मी ग
नको काहीच मला ।
उदास होते मन आणि
क्षणच नको वाटतो ।
अंतरात माझ्या तूच
श्वासही आतच दाटतो ।
Sanjay R.


" काळजात घाव "

झाला काळजात घाव
वाटतं निरंतर पाहावं ।
मनाला कशी ही हाव
विचारांची किती धाव ।
देऊ कुठले यासी नाव
प्रेम म्हणतात ते हेच राव ।
प्रेमा विना कुठे निभाव
जाल तिथे आपुला गाव ।
माणुसकीचा तिथेच ठाव ।
उरेल माणसाचे तिथेच नाव ।
Sanjay R.