Wednesday, October 24, 2018

" नको थांबवू श्वासांना "

शोधू कुठे मी सांग आता
रात्रीच्या त्या स्वप्नांना
भिरभिर भिरभिर नजर माझी
वेध लागले नेत्रांना

हळूच घेते चाहूल तुझी रे
साद हवी या कानांना
शब्दही झाले अबोल माझे
बोलके कर या ओठांना

हिरमुसले हे मन माझे
नको थांबवू श्वासांना
तुझ्या विना रे मी सख्या
लपवू कुठे या असवांना
Sanjay R.



Monday, October 22, 2018

" नको करू नौस "

बाबू देऊ नको धौस
पुरी कर ना हौस

देवा पुढं राजा
कहाले करतं नौस

न्हाई देवाले कमी
वाटी नकु जाऊस

लेकरं बाळं पाय
उपाशी नको ठेऊस

काम धाम सोडून श्यानी
निस्ती सपनं नाकु पाहूस

जग लय मोठ्ठ हाये
लय नको धावूस

परपंच असाच असते
रडगानं नको गाऊस

मेहनतीनच भेटन तुले
मांगं नको ऱ्हाऊस
Sanjay R.

Tuesday, October 16, 2018

" नवरात्र "

माते तुझे रूप अनेक
नमन करतो मी तुझाच लेक

काली तू महाकाली ही तू
दुर्गा तू माँ भवानी ही तू

तूच अंबा अंबिकाही तूच
चंडिका तू जगदंबा तूच

तू जगत्जननी रागिणी तू
विघ्न नाशिनी ही तूच

भक्ती तू करुणेचा सागर
शक्ती तू कृपेचा जागर

तूच देवी तूच माता
चरणी नमन करतो आता
Sanjay R .

" दिवाळी दसरा "

बघा आली दिवाळी आला दसरा
चेहरा दिसतोय साऱ्यांचाच हसरा

चिंगी मिंगी चा बघा, कसा किती नखरा
नवे हवेत कपडे, सुरु बाजारच्या चकरा

हिला पण हवा, दागिना सोन्याचा खरा
सायंकाळीच जाऊ या, लवकर याल जरा

गर्दी गोंधळ घाई गडबडीत बाजार फिरा
हे हवं, ते हवं, हवा हवा वाटे बाजार सारा

विचार नकोच जास्त फक्त थैली भरा
दिवस सणासुदीचे, खिसा रिकामा करा

बघा आली दिवाळी आला दसरा
चेहरा दिसतोय साऱ्यांचाच हसरा
Sanjay R.

Sunday, October 14, 2018

" तीर "

बहकता है दिल मेरा
जब देखता हु 'तेरी यह तस्वीर ।
धडकती है सासे
धुंडती है नजरे तुझे बनके तीर ।
Sanjay R.