Saturday, August 11, 2018

" हवा झाली बेधुंद "

गुलाब तू मोगरा तू
चाहुकडेची आनंद ।
फुलली तू हसली तू
हवाही झाली बेधुंद ।

शिरलीस तू श्वासात जेव्हा
चढली नशा मंद मंद ।
मोहरले कण कण सारे
संग तुझ्या मी बेधुंद ।

मिठीत माझ्या येताच तू
तुटून गेले सारे बंध ।
गळून पडल्या पाकळ्या परी
भरला मनात सुगंध ।
Sanjay R.

Friday, August 10, 2018

" बालपण परत मिळावं "

खरंच वयानं थोडं थांबावं
परतून बालपण एकदा मिळावं ।

स्वप्नांनी थोडं मनाला छळावं
अंतराला थोडं सुख कळावं  ।

आयुष्यानंही छान आनंदानं
परत परत मस्त जगून घ्यावं ।

दिवस संपले कि मग
शांत चित्तानं परत जावं ।

खरंच वयानं थोडं थांबावं
परतून बालपण एकदा मिळावं ।
Sanjay R.

Monday, August 6, 2018

" ही वाट दूर जाते "

दूर जायचे कुठे
ही वाट दूर जाते ।

एकटे चालतांना
मनी आठवण येते ।

ठाव मजसी आहे
वाट कोण पहाते ।

अर्धांगिनी घरी ती
अतूट तीचे नाते ।

लेकरं छोटी छोटी
आस कुणास शोधते ।

वाटेवरती डोळे सारे
अंतरात ही वाट जाते ।

दार घराचे तुझ्यारे
वाट तिथेच जाते ।
Sanjay R.

Sunday, August 5, 2018

" घोर नको लावू "

घोर नको लावू आता
जीवले माह्या ।

कवा पासून सांगतो
मनात काय माया ।

जवा जवा येते आठोन
चेरा दिसते तुया ।

मन महा धावते मंग
लागत न्हाइ  डोया ।

चित्तच जाते निंगून आनं
छातीत खुपते सुया ।
Sanjay R.

Thursday, August 2, 2018

" रे मना काय तुझा गुन्हा "

अरे माझ्या मना

काय तूझा गुन्हा ।


स्वप्नात कधी तू

कधी विचारात ।


आनंदात कधी तर

कधी दुःखाच्या आवेगात ।


क्षणात इथे तर

क्षणातच रे तू कुठे ।


कधी असते तुला आस

तर कधी वाटे जीवन फास ।


कधी प्रेमाचा ध्यास

कधी शून्यात प्रवास ।


आहेस तू सखा खास

सुखद मज तुझा सहवास ।


रे मना नकोरे लावू हव्यास

निरंतर चालू दे श्वास ।


Sanjay R.