Tuesday, February 6, 2018

" इशारा "

आनंदाने बघ झुलतो वारा
टपटप पडती पाउस धारा ।

धुसर झाल्या गगनात तारा
फुलला मनात मोर पिसारा ।

पाणी पाणी झाला पसारा
कळला मज तुझा इशारा ।
© Sanjay R.

Monday, February 5, 2018

" मोल आसवांचे "

ह्रुदयावर पडता आघात
वेदना होइ अंतरात ।
घाव मनाचे सुकतिल कधी
दिसे दुख:भरल्या डोळ्यात ।

बाण असो शब्दांंचे वा
तिर ते जाणीवांचे ।
बंध तुटतो मनाचा एक
मोल काय त्या आसवांचे ।
© Sanjay R.

Friday, February 2, 2018

" भिजू या थोडं "

रिमझिम बरसतो
अंगणात माझ्या पाउस ।
चल ना सखे भिजू या थोडं
कोरडी अशी नको राहुस ।

सजली मैफिल या धरेवरी
एकटीच तु नको गाउस ।
निनादतो नाद ब्रम्हांडी
चल होउ या एकदा पाउस ।

टपटप सरींची होते बरसात
खिडकीतुनच तु नको पाहुस ।
येना जरा भिजवून अंग
होउ या थोडं पाउस ।
© Sanjay R.

Thursday, February 1, 2018

" घाव काट्याचे "

अंतराच्या पटलावर
लिहिले नाव मी प्रेमाचे ।

हसतो तो गुलाब अजूनही
कळले असेल का त्यास मनाचे ।

वाटते भिती कधी कधी
भळभळेल रक्त घाव काट्याचे ।

पाकळ्या तर तिथेच फुलतात
करु काय मी या दिलाचे ।

फुलतो मोगरा झाडावर परी
देतो दरवळ क्षण आनंदाचे ।
©Sanjay R.

" चंद्र ग्रहण "

लागलं चंद्राला
ग्रहण आज ।
उतरला चमचमणारा
त्याचा साज ।

खुलली चांदणी
हसली गालात ।
अंधाराला दिली
आज तिने मात ।

मिरवेल सुर्यही
होता उद्या प्रभात ।
तुटेल कशी तिघांची
जन्मोजन्मीची साथ ।

विटाळला माणुस
धरेला आघात ।
अंतराळातले चक्र
दिवस आणी रात
© Sanjay R.