Thursday, September 28, 2017

"रावण दहन "

गरीब बिच्चारा रावण
जळायला झाला तय्यार
ईतिहासाची फळं भोगतो
बदललेत आता आचार
माणसं झालेत रावण आता
पुरूषोत्तमचाही आला नकार
सीता माता उरली कुठे
पसरला चोहिकडे फक्त विकार
दशासनाचे दहाच अवगुण
माणसात आले सारेच प्रकार
राक्षस हरला देव सरला
पृथ्वीतलावर नुसता विखार
Sanjay R.

" अंतरंग "

नदिच्या काठावर
प्रवाहाच्या लाटेवर
हळुच उठनारे तरंग
अस्वस्थ हे अंतरंग
दूर तो पैलतीर
वाहता वारा अधीर
शुन्न्यात नजर
रीती घागर
डबडबले डोळे
पाण्यात पाणी मीळे
Sanjay R.


Wednesday, September 27, 2017

रेशीम गाठी

तु माझ्यासाठी
मी तुझ्यासाठी
जीवनाच्या या
रेशीम गाठी .
संसार आपुला
आपल्या पाठी
चालेल पुढे येइस्तो
हातात काठी.
Sanjay R

Monday, September 25, 2017

" जीवन सागराच्या लाटा "

जीवन जशा
सागराच्या लाटा
एकमेकात गुंफलेल्या
रंगीबेरंगी छटा
कधी वळणा
वळणाच्या वाटा
कधी सरसरुन
यावा अंगावर काटा
कधी हसरा मुखवटा
तर कधी आसवांच्या लाटा
Sanjay R.

Friday, September 22, 2017

" अंबा तु जगदंबा "

तूच दुर्गा तू पार्वती
देवी तू तर आदी शक्ती ।
तूच ब्रम्हांड तुच सृष्टी
चरा चरात या तुझीच शक्ती ।
तुच माता तुच भक्ती
तुच आहेस शिवाची शक्ती ।
शांती रुपेण तु कधी काली
दुष्ट नाशीणी देसी मुक्ती ।
ज्ञान विद्या तु आहे भगवती
तुझीच गाथा तुज पुजिती ।
अंबा तु जगदंबाही तु
जगत जननी आहेस विधाती ।
भक्ती शक्ती तु  आदि माया
चरणी तुझिया अर्पितो काया ।
Sanjay R.