Monday, November 7, 2016

" निवांत "

नाही मजला ठाव
झालेत कीती  सांगु
मनावर माझ्या घाव ।
नको वाटतं सारं
दुर त्या काठावर
उभी जशी एक नाव ।
चिंतेचे सावट मनी
दिसेलका माझा गाव ।
आठवणींचा उभार
काढ डोहातुन मज
देवा तु तरी पाव ।
नको आता एकांत
मन झाले अशांत ।
आहे एकच खंत
नको संपवु सारे
कर मज निवांत ।
Sanjay R.

" जिवन धारा "

कुणास  मिळतो उबदार वारा
तर कुणी झेलतो थंडीचा मारा ।
कसा हा सारा जिवनाचा फेरा
नशीबाशी जुळते जिवनाची धारा ।
Sanjay R.

Thursday, November 3, 2016

" हास्य "

बघुन हास्य तुझे
मीही हसलो गालात  ।
गुरफटलो तुझ्यात इतका
ठेवले तुज ह्रुदयात ।
जडला छंद मज आता
नाही उरलो कशात ।
भिरभीरते नजर ही अशी
शोधतो मी मज तुझ्यात ।
Sanjay R.

Tuesday, November 1, 2016

" कळी फुलवू शब्दांची "

चला जाउ या
कवितेच्या गावी ।
संग्रह शब्दांचा
करु तीच्या नावी ।
कळी फुलवू शब्दांची
गुंफु माळ अलंकारांची ।
Sanjay R.

" फुलली सकाळ *

नाकात नथनी
गळ्यात माळ ।
बाजुबंध तुझे
फुलली सकाळ ।

कपाळी बींदी
केसात गजरा ।
चेहर्यावर भाव
वाटतो लाजरा ।

चंद्रकोर कपाळी
हास्य मनोहारी ।
खुलले तुझे रुप
शालुत भरजरी ।
Sanjay R.