Tuesday, October 25, 2016

" कळत नाही "

कळतं पण
वळत नाही ।
नको तेच
टळत नाही ।
धावा कितीही
पळत नाही ।
फिल्टर लाउनही
गळत नाही ।
पेटवा कितीही
जळत नाही ।
चक्कीत टाका
दळत नाही ।
मनातली त
ढळत नाही ।
तुजविण कुणीच
छळत नाही ।
सांगु कुणास
कळत नाही ।
Sanjay R.

Saturday, October 22, 2016

" चंद्र तारे "

हवेत कशाला तुला
चंद्र आणी तारे ।
मांडतात आकाशी
नुसतेच पसारे ।
कधीतरी येतील
जातील घेउन वारे ।
सांग गुलाब मोगरा
देइल मी सारे ।
लेखणीतुन फुलु दे
कवितेचे पिसारे ।
Sanjay R.

" नवी सकाळ "

सुर्याच्या किरणांसोबत
दरवळतो सुगंध गुलाबाचा ।
संचारतो आनंद आणी उत्साह
झालो चातक मी श्वासाचा ।
रोज नवरंगी फुलांना
घेउन येते एक नवी सकाळ ।
वाटते केसात तुझ्या माळुनी
वेचावे गुलाबी हास्य मधाळ ।
Sanjay R.

" विचार "

नको करुस काहीच तु
आत्मचिंतन हे नाही बरे।
उगाच ताप नको डोक्याला
झालेत वेडे खुप सारे ।

स्वच्छदी तु जगुन बघ
खळखळुन थोडे  हसुन बघ ।
फसवे इथे आहे सारे
दिवस आजचा जगुन बघ ।

कष्टा विना नाही फळ
पावलो पवली आहेत गळ ।
निर्धार पक्का हवा मनाचा
जिवनाला मग येयील बळ ।
Sanjay R.

Friday, October 21, 2016

" एक सकाळ "

रोजचीच एक
नेहमीसारखी सकाळ ।
फेकली सुर्यानं
प्रकाशाची माळ ।
दुर मंदीरात चाले
विठ्ठल नामाचा गजर ।
धावपळ सार्या जनांची
आहे भुकेले पोट हजर ।
पोट बघुन छोटे मोठे
भुकेचा तसाच आकार ।
अत्रुप्त नेहमीच आतमा
नाही कशालाच नकार ।
Sanjay R.