Saturday, September 10, 2016

" नातं "

तुझं आणी माझं
काय कोणतं नातं आहे ।
गहु आणी गव्हाचं पीठ
दोघांच्या मधे जातं आहे ।
Sanjay R.

Thursday, September 8, 2016

आले गौरी गणपती

आले आले घरा गौरी गणपती
कामं करायची थांबली गती ।
मदतीला नाही कोणी कामं हाती
रोज सारखेच रुसले माझे पती ।
पुजा प्रसाद करायच्या वाती
बोलवुन सार्यांना जपायची नाती ।
Sanjay R.

Wednesday, September 7, 2016

" अश्रु संपायचे आहेत "

आलो असा मी जन्माला
जिवन हे माझेच आहे ।
राबतो मी रोज मरतो
कष्ट उपसत जगायचे आहे ।
जग मोठे अलौकीक हे
रंग सारेच बघायचे आहे ।
माणुस माणसाचा काळ इथे
लाकडं चितेची रचायची आहेत ।
स्वार्थी कुणी परमार्थी इथे
अर्थी रोजच उचलायच्या आहेत ।
मरत मरत जगायचे
अश्रु अजुन संपायचे आहेत ।
Sanjay R.

Tuesday, September 6, 2016

" मनातल्या फुला "

माझ्या मनातल्या फुला
सांग मी किती वर्णु तुला ।
वाहतो ओसंडुन आनंद
घेते मन उत्साहाचा झुला ।
श्वास मावेना ह्रुदयात
झोत हवेचा आसमंतात खुला ।
खेळते मन कधी आकाशी
खेळु धरेशी लपाछपी चला ।
Sanjay R.

Sunday, September 4, 2016

" काळा अंधार "

दिवसाच्या उजेडात कसा
झाला काळा कुट्ट अंधार ।
तुटली सारी स्वप्न आता
सरला डोळ्यातला पाझार ।
झाले जड जगणे आता
कसा झेलु खांद्यावरी भार ।
सावली ही  गेली सोडुन
तुटली संगे बांधलेली तार ।
गेला सुटुन कीनारा आता
वाटे कठीन हा जिवन संसार ।
Sanjay R.