Thursday, July 7, 2016

" रंगोळी "

रंग पांढरा शांतीचे प्रतीक
लाल रंगात  प्रेमच अधीक ।

हिरवा पिवळा निळा काळा
सार्याच रंगात मनाचे गुपीत ।

नवरंगांची ही दुनीयाच न्यारी
इंद्र धनुतही उधळते रंगोळी ।

प्रसन्न चीत्त आनंदी मुद्रा ।
खुलुन दिसते गालावर खळी ।
Sanjay R.

Wednesday, July 6, 2016

" स्वच्छतेचे आम्ही पुजारी "

स्वच्छतेचे आम्ही पुजारी
यात कसली आली हुशारी ।

मेहनत करतो दिवसरात्र
सुखी जिवनाचा हाच का मंत्र ।

जिवनात अवलंबीली ईमानदारी
मिळकत झाली शुन्याहुन भारी ।

घेउन झाडु चला दारो दारी 
स्वच्छ करु या नगरी सारी ।

माणसं इथली सारी आजारी
पाठ जिवनाचा का इतका भारी ।

देवा विठ्ठला कशी रे ही पंढरी
घडव एकदाची सगळ्यांना वारी ।

पापी जनानवर कर तु स्वारी
स्वच्छ भारत.... उंच भरारी ।

विठ्ठल विठ्ठल पंढरीची वारी ।।
Sanjay R.

Monday, July 4, 2016

" दिसतय जग "

झाडाआडुन डोकावतो
पावसाचा एक ढग ।
पडायचे पाउस होउन
आहे त्याच्यात रग ।
सरली बरं आता
लाल सुर्याची धग ।
नजरेचा एक कटाक्ष
तिरकी तु डोळ्यात बघ ।
डोळ्यात मज तुझ्या
सारं दिसतय जग ।
Sanjay R.

Sunday, July 3, 2016

" सुख आणी दुख: "

आनंद आणी दुखा:चे
मिलन आहे जिवन ।

बघता क्षितीजा पुढे
अनंत आहे गगन ।
Sanjay R.

विचारांना कुठे
असतो विषय ।

उठतील तरंग जिकडे
धावेल मन तिकडे ।

कधी फुलेल मनमोहक
कधी अंतरात दुखावेल ।
Sanjay R.

Saturday, July 2, 2016

" रिमझीम रिमझीम "

रिमझीम रिमझीम
सरींची बरसात ।
झाली आता
कामाला सुरवात ।
भिजायचा आनंद
सुखावतो मनात ।
सरली चिंता
उत्साह ढगात ।
फुलली धरा
हिरवळ अंगणात ।
Sanjay R.