Thursday, June 9, 2016

" आले पावसाचे दिवस "

आले आले बघा
पावसाचे दिवस ।
बघायचा आता
जमीनीचा कस ।

नागरन वखरन
झाली खुप मेहनत ।
येउ दे रे पाउस
करील सारे स्वागत ।

करायची पेरणी
गातो पावसाची गाणी ।
कापुस सोयाबीन
का देतील खुप नाणी ।

बळी राजा जगतो
फक्त आशेवर ।
पण मेहनत त्याची
होते मणभर ।

दाण्यात बघतो
स्र्वप्न सुंदर ।
पण हाती त्याच्या
का येते कणभर ।

आकाशात तो
नेहमी बघतो ।
उमेद नवीन
घेउन तो जगतो ।

देवा स्वप्न त्याची
होउ दे रे पुरी ।
मुलांना खाउ दे
श्रिखंड पुरी ।
Sanjay R.

Wednesday, June 8, 2016

" आला आला पाउस "

थंड थंड वारा
सोबतीला
पावसाच्या धारा ।
आकाशात बघा
ढगांचा फेरा ।
सुकला गळा
तहानलेली धरा ।
आला आला पाउस
नदी नाले भरा ।
फुटु दे अंकुर
हिरवळ पेरा ।
Sanjay R.

नभ काळे जमले आकाशात
होता गडगड धडधड होइ मनात ।
होताच दोन नभांची तकरार
त्यातुन होइ विजेचा लखलखाट
कळलेच नाही मजला आज
आणी झाली पावसाला सुरुवात ।
झाडे झडुप भिजले सारे
आनंदाने न्हाली धरा सुगंधात ।
रुजेल बी फुलेल अंकुर
फळेल वसुंधरा नवचैतन्यात ।
Sanjay R.

Sunday, June 5, 2016

" व्यथा पाखरांची "

खरच काय हालत झाली असेल त्या छोट्या छोट्या चिमण्याची । छोटासा जीव त्यांचा । काल अंगणात लाल मिरच्या वाळत होत्या । आणी या छोट्या छोट्या चिमण्या त्या मिरचीतलं बी टिपत होत्या । मला हेवा वाटला त्यांचा । जेवायला बसलो आणी वाटलं चला आपणही एखाद मिरची खाउन बघावी । खाल्ली पण वरुन चांगलं दोन ग्लास थंड पाणी आणी साखर खावी लागली । आणी आजची सकाळ तर न विचारलेलीच बरी । मनात विचार आला खरच आपली ही अवस्था झाली तर त्या चिमण्यांची काय व्यथा असेल । त्या तर दिवसभर नुसतं मिरचीचं बी टिपत होत्या ।
जाउ द्या मनात आलं ते लिहीलं ।
आता बरं वाटतय ।
Sanjay R.

Friday, June 3, 2016

' असेल जरी कमी "

नको आम्हा  दया
फक्त हवी माया ।
आभार देवाचे
दिली आम्हा काया ।
असेल जरी कमी
जन्म नाही वाया ।
इमानानं जगु
धरणार नाही पाया ।
कष्टानं मिळवु सुख
सोबत आनंदाची छाया ।
चार पावलं चालु सोबत
सहभागी तुमचा व्हाया ।
Sanjay R.

" राज्य बळीचे "

नकोच ती कल्पना
मनात पुन्हा पुन्हा ।
कष्ट करुन जगतो
काय त्याचा गुन्हा ।

उपाशी त्याची पोरं
सोबतीला गुरं ।
चिंता इतरांची वाही
कुणास ठावं काय बरं ।

फाटकं तुटकं घालतो
आणी कापुस पिकवतो ।
सारंच जनास देतो
स्वतःला काय घेतो ।

नाही येणार कधीच
राज्य बळीचे ।
बरेच आहेत इथे हो
नारद कळीचे ।
Sanjay R.