Tuesday, May 31, 2016

" स्वप्नांची दुनीया "

स्वप्न दुनियेत
अजबच घडले ।
रोज स्वप्नांचे
व्यसनच जडले ।
कधी मधी होते
आकाशाची सैर ।
आणी कधी कधी
तर प्रृथ्वीचा फेर ।
कधी उठवायला
येते अप्सरा ।
कधी अवतरतो
राक्षस भराभरा ।
कधी हळुच
गालात हसतो ।
नाहीतर डोळ्यात
आसु दिसतो ।
स्वप्नांची ती
दुनीया न्यारी ।
मन हलके
देह भारी ।
Sanjay R.

" वणवा "

गुण गुण गुणीत
गुण गुण गुणीत
काय तुझ्या मनात
सांग माझ्या कानात ।
नाही पाणी तळ्यात
सुकली आसवं उन्हात ।
पटला वणवा वनात
सरले सारे क्षणात ।
Sanjay R.

Friday, May 27, 2016

" काळोख "

अवतरला चंद्र नभात
चमचमती चांदण्या अंगणात ।
मधेच सळसळ पानांची
का धडधडते ह्रुदय काळोखात ।
Sanjay R.

" सागर किनारा "

अथांग सागर
आणी त्याच्या लाटा ।
धाव किनारी
नाहीत तिथे वाटा ।
शोधतात अंत
परत जाता जाता ।
सुटतात खुणा
नाही कुणी विधाता ।
खेळ भरती ओहटीचा
चाले समुद्री साता ।
Sanjay R.

Thursday, May 26, 2016

" पीहु पीहु "

बात दिलकी
मै तुझसे कहु ।
क्या मै तेरे
दिलमे रहु ।
कह दे मुझको
क्या तुझे चाहु ।
माॅ को उसकी
दे दु बहु ।
होगी क्या तु
मेरी पीहु ।
Sanjay R.