Sunday, February 8, 2015

" काशी "

शरीराच हे असच
थकल भागल की
जाते जिवानीशी ।
आम्ही म्हणतो चला
अस्थी विसर्जनाला
जाउ काशी ।
Sanjay R.

Sunday, February 1, 2015

" नुसती मर मर "

दिवस रात्र चालते मर मर
दिली देवान फुटकी घागर ।

सोबत आहे कष्टाचा डोंगर
सुकले रक्त आटला सागर ।

तुटका संसार फाटका पदर
भुकेची आग आजाराची भर ।

स्वप्नातच बघतो स्वत:चे घर
रोज चालते नुसती मर मर ।
Sanjay R.

सहा दिवस काम
कपाळावर घाम ।
शेवटी येतो सन्डे
मग मिळतो आराम ।
Sanjay R.

Friday, January 23, 2015

" ध्यास "

दिधले मज का असे तु विठ्ठला
नाही काहीच माझ्या गाठीला ।
भोगतो अठरा विश्व दारिद्र्य 
कसा मी येउ सांग पंढरीला ।
Sanjay R.  

जिवंत असल्याची चाहुल
देतो प्रत्येक येणारा श्वास ।
तरीही मनात असतेच धास्ती
नकळत येताच ती काळरात्र
संपतील का सारेच आभास ।
विचारांनीच मन होते शुन्य
लागे ध्यानी मग अंताचा ध्यास ।
Sanjay R.

" आशा "

नजरेत एक हलकी आशा
पार करतो पदरी निराशा ।

फुलती मनात बहु आकांक्षा
अचुक कुठली न कळे दिशा ।

प्रेम भुकेला नसे प्रतीक्षा
पैसाच का ही अनमोल भाषा ।
Sanjay R.


Thursday, January 22, 2015

" गुंज "

बात दिलकी जब सामने आयी
तुट गयी अब मनकी तनहायी ।
फुल भी तब कही महेक उठा
ओर यादमे गुंज उठी शहनाई ।
Sanjay R.

काढल सार धुवायला
ध्यास मनी स्वच्छतेचा ।
आपटुन आपटुन धुतले
विळले धागे मनाचे ।
Sanjay R.