Friday, January 23, 2015

" ध्यास "

दिधले मज का असे तु विठ्ठला
नाही काहीच माझ्या गाठीला ।
भोगतो अठरा विश्व दारिद्र्य 
कसा मी येउ सांग पंढरीला ।
Sanjay R.  

जिवंत असल्याची चाहुल
देतो प्रत्येक येणारा श्वास ।
तरीही मनात असतेच धास्ती
नकळत येताच ती काळरात्र
संपतील का सारेच आभास ।
विचारांनीच मन होते शुन्य
लागे ध्यानी मग अंताचा ध्यास ।
Sanjay R.

" आशा "

नजरेत एक हलकी आशा
पार करतो पदरी निराशा ।

फुलती मनात बहु आकांक्षा
अचुक कुठली न कळे दिशा ।

प्रेम भुकेला नसे प्रतीक्षा
पैसाच का ही अनमोल भाषा ।
Sanjay R.


Thursday, January 22, 2015

" गुंज "

बात दिलकी जब सामने आयी
तुट गयी अब मनकी तनहायी ।
फुल भी तब कही महेक उठा
ओर यादमे गुंज उठी शहनाई ।
Sanjay R.

काढल सार धुवायला
ध्यास मनी स्वच्छतेचा ।
आपटुन आपटुन धुतले
विळले धागे मनाचे ।
Sanjay R.

Tuesday, January 20, 2015

" जागर "

देवा भक्त तुझे आम्ही
करीतो नामाचा तुझ्या जागर ।
विसरलो तन मन धन सारे
दर्शनास लोटला जनाचा सागर ।
Sanjay R .

Thursday, January 15, 2015

" प्रित शब्दांची "

शब्द तुझे लेखणी माझी
बहरली प्रित कवितेची ।
बघ दुर आकाशी
भरारी बेधुंद या मनाची ।
Sanjay R.

गाणी गोड मज गाउ दे
शब्द तुझे कानी येउ दे ।
प्रित शब्द अन लेखणीची
अशीच अखंड फुलु दे ।
Sanjay R.

गोडवा तिळ गुळाचा
शबादांना देइल मिठास ।
जिभेवरची चव मग
उतरेल कवितेत विनाप्रयास ।
Sanjay R.

का रुसले शब्द
माझ्या लेखणीतले ।
देइल मी तिळगुळ
लिहायचे मज मनातले ।
Sanjay R.